आता विद्यार्थ्यांना १0 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका
By Admin | Updated: February 11, 2015 06:26 IST2015-02-11T06:26:08+5:302015-02-11T06:26:08+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावी परीक्षेला

आता विद्यार्थ्यांना १0 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी १0 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे वाचन करता यावे आणि त्यांना प्रश्नपत्रिका समजून घेता यावी, यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना सध्या परीक्षा केंद्रात परीक्षेपूर्वी ३0 मिनिटे अगोदर प्रवेश देण्यात येतो. त्यानंतर परीक्षेला २0 मिनिटे शिल्लक असताना विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका, बारकोड, होलोक्फॉट देण्यात येतो. उत्तरपत्रिकेवरील सूचनेनुसार पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. परंतु येत्या परीक्षेला विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेवरील माहिती भरल्यानंतर प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत.
मंडळाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी दहावी-बारावीच्या येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या परीक्षेपासून होणार आहे. (प्रतिनिधी)