मराठा आरक्षणाची अधिसूचना जारी नाही

By Admin | Updated: July 1, 2014 01:36 IST2014-07-01T01:36:37+5:302014-07-01T01:36:37+5:30

नुकत्याच जाहीर झालेल्या मराठा व मुस्लीम आरक्षणाची अधिसूचना अद्याप जारी झाली नसल्याचे अॅडव्होकेट जनरल डी़ज़े खंबाटा यांनी सोमवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केल़े

Notification of Maratha reservation is not in progress | मराठा आरक्षणाची अधिसूचना जारी नाही

मराठा आरक्षणाची अधिसूचना जारी नाही

>मुंबई : नुकत्याच जाहीर झालेल्या मराठा व मुस्लीम आरक्षणाची अधिसूचना अद्याप जारी झाली नसल्याचे अॅडव्होकेट जनरल डी़ज़े खंबाटा यांनी सोमवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केल़े
न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठासमोर ही माहिती देण्यात आली़ ती ग्राह्य धरत न्यायालयाने ही सुनावणी 9 जुलैर्पयत तहकूब केली व याचे प्रत्युत्तर सादर करायचे असल्यास शासनाने करावे, असेही न्यायालयाने सांगितल़े या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी जनहित याचिका दाखल केली. महाराष्ट्राचे  99 टक्के माजी मुख्यमंत्री मराठा समाजाचे होत़े सर्वाधिक साखर कारखाने व भूखंडही याच समाजाकडे आहेत़ तेव्हा समाज मागासलेला असू शकत नाही़ तेव्हा या आरक्षणाची अधिसूचना जारी करू नये, अशी मागणी तिरोडकर यांनी याचिकेत केली आह़े 
दरम्यान, 5क् टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असू नये असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असताना मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण दिल्याने महाराष्ट्रात एकूण आरक्षण 73 टक्के झाले आह़े तेव्हा राज्यपाल यांनी याचा वटहुकूमच जारी करू नये, अशी मागणी अॅड़ सदावर्ते यांनी केली आह़े (प्रतिनिधी)
 
केतन तिरोडकर यांच्यावर शाई फेकली
मराठा आरक्षणाला आव्हान देणारे सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांच्यावर मराठा महासंघाचे दिलीप पाटील यांनी काळी शाई फेकली़ सुनावणी संपल्यानंतर न्यायालयाबाहेर तिरोडकर हे माध्यमांना न्यायालयात झालेल्या युक्तिवादाबाबत माहिती देत होत़े त्या वेळी पाटील यांनी तिरोडकर यांच्यावर या याचिकेचा निषेध म्हणून शाई फेकली़

Web Title: Notification of Maratha reservation is not in progress