सुरक्षारक्षकांना दौलतजादा प्रकरणी नोटिसा
By Admin | Updated: February 2, 2015 04:45 IST2015-02-02T04:45:48+5:302015-02-02T04:45:48+5:30
माघी गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात लावणी नर्तकीवर पैसे उधळणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारल्यानंतर आता आप्पा जगताप आणि पराग कर्णिक या
सुरक्षारक्षकांना दौलतजादा प्रकरणी नोटिसा
कल्याण : माघी गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात लावणी नर्तकीवर पैसे उधळणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारल्यानंतर आता आप्पा जगताप आणि पराग कर्णिक या दोघा सुरक्षारक्षकांना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. डोंबिवली विभागीय कार्यालयात माघी गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात कर्मचाऱ्यांनी नोटा उधळण्याचा प्रताप केला होता.
या प्रकरणी झालेल्या चौकशीत दोषी ठरलेल्या ११ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ठरावीक व्यक्तींवरच कारवाई करण्यात आल्याचे सांगत काही कर्मचाऱ्यांना मात्र राजकीय वरदहस्तामुळे अभय मिळाल्याचा आरोप निलंबित कर्मचाऱ्यांनी केल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कर्मचाऱ्यांकडून कारवाईतून वगळण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या नृत्याची चित्रफीत प्रशासनाला सादर करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या जगताप आणि कर्णिक या दोघा सुरक्षारक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे. (प्रतिनिधी)