अजित पवार, मोहिते पाटील यांना सहकार विभागाकडून नोटिसा
By Admin | Updated: October 30, 2014 01:42 IST2014-10-30T01:42:59+5:302014-10-30T01:42:59+5:30
राज्य सहकारी बँकेला झालेल्या सुमारे 13क्क् कोटी रुपयांच्या तोटय़ासाठी जबाबदार असल्याबद्दल तत्कालिन संचालकांना चौकशी अधिकारी शिवाजी पहिनकर यांनी नोटीसा काढल्या
अजित पवार, मोहिते पाटील यांना सहकार विभागाकडून नोटिसा
पुणो : राज्य सहकारी बँकेला झालेल्या सुमारे 13क्क् कोटी रुपयांच्या तोटय़ासाठी जबाबदार असल्याबद्दल तत्कालिन संचालकांना चौकशी अधिकारी शिवाजी पहिनकर यांनी नोटीसा काढल्या असून त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.
नियम धाब्यावर बसवून तोटय़ातील साखर कारखाने, सूत गिरण्या यांना केलेला कर्जपुरवठा तसेच वसुली करण्याकडे दुर्लक्ष यामुळे राज्य सहकारी बँकेला सुमारे 13क्क् कोटी रुपयांचा फटका बसला. प्रभारी सहकार आयुक्त दिनेश ओऊळकर यांनी रिझव्र्ह बँकेस एप्रिल 2क्11 मध्ये बँकेवर प्रशासक नियुक्त करण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार 7 मे रोजी सचिव सुधीरकुमार गोयल यांची प्रशासकपदी नियुक्ती झाली. सहकार कायद्याच्या कलम 83नुसार झालेल्या चौकशीत कोटय़वधींचा गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर जबाबदारी निश्चितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ती समाप्त झाल्यानंतर पहिनकर यांनी नोटीसा बजावल्या.
यामध्ये तत्कालिन अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, पांडुरंग फुंडकर, यशवंतराव गडाख, नितीन पाटील, अमरसिंह पंडित, राजवर्धन कदमबांडे, विजय वडेट्टीवार, ईश्वरचंद जैन, दिलीपराव देशमुख, जे.एन.पाटील, विलासराव जगताप, आनंद अडसूळ, दिलीप सोपल, रजनी पाटील यांचाही समावेश आहे. (प्रतिनिधी)