करोडोची वसुली बाकी : उत्तरासाठी १५ दिवसांचा अवधीनागपूर : बसची दुरवस्था, रॉयल्टीची अपूर्णता व शुल्क वाढीकडे लक्ष वेधत मनपा प्रशासनाने स्टार बस ऑपरेटर वंश नियम इन्फ्र ा प्रोजेक्ट लि. (व्हीएनआयएल) ला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या नोटीसमध्ये ऑपरेटरने कराराचे उल्लंघन केल्यामुळे हे कंत्राट का रद्द करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली आहे. येत्या १५ दिवसात नोटीसचे उत्तर द्यावे, असे निर्देश मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी कंत्राटदाराला दिल्याची पुष्टी उपायुक्त संजय काकडे यांनी केली. स्टार बसच्या कंत्राटदाराने २0१४ पर्यंंंत रॉयल्टीचा भरणा केलेला नाही. बस खरेदीची रक्कमही भरलेली नाही. मोरभवन परिसरातील तिन्ही पार्किंंग स्टॅण्डच्या जाहिराती, अशा विविध प्रकारच्या शुल्कापोटी मनपाचे ८ कोटी २५ लाख ६५ हजार १६४ रुपये कंत्राटदारावर आहे. केंद्र सरकारकडून मनपाला २४0 बसेस मिळाल्या होत्या. त्यासाठी मनपाला ३0 टक्के रक्कम भरायची होती. मनपाने केलेल्या करारानुसार ही रक्कम व्हीएनआयएलला भरायची होती. मात्र कंत्राटदाराने अद्यापही १ कोटी ७९ लाख रुपये भरलेले नाही. या रकमेवर मनपाने २४ टक्के व्याज आकारले आहे. त्याचबरोबर रॉयल्टीचे २ कोटी ३४ लाख ५३ हजार ८५९ रुपये बाकी आहे. त्यावरही ५६ लाख २८ हजार ९२६ रुपये व्याजाची आकारणी केली आहे. पार्किंंंगसाठी आंदोलन केल्यानंतर मोरभवन परिसरात तीन पार्किंंंग स्टॅण्ड उपलब्ध झाले. मात्र पार्किंंंगच्या जागेपोटी कंत्राटदाराने द्यावयाची रक्कम अद्यापही मनपाला मिळालेली नाही. जाहिरातीच्या स्वरूपात मिळणारी ५0 टक्के रक्कम जी ४0 लाखावर आहे, ती मनपाकडे जमा केली नाही. पटवर्धन शाळा, हिंगणा रोड, बैद्यनाथ वर्कशॉप व झिरो माईल येथे बस पार्किंंंग करण्यासाठी मनपाने जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेचा १ लाख ४९ हजार ९३२ रुपये किराया सुद्धा भरलेला नाही. मनपा उपायुक्त संजय काकडे म्हणाले की, कंत्राटदाराकडून करोडो रुपयांची वसुली करण्यासाठी मनपाने कंपनीला कायदेशीर नोटीस दिली असून, १५ दिवसात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहे. कंत्राटदाराकडून उत्तर आल्यानंतरच करार रद्द करावयाचा किंवा नाही यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. नवीन बस ऑपरेटरसाठी प्रयत्न सुरू स्टार बसचे संचालन करण्यासाठी चार ऑपरेटर्सनी निविदा भरली आहे. यात ऑपरेटरच्या १00 बसेस सोबत जेएनएनयूआरएम अंतर्गत मिळालेल्या २४0 बसेसचे संचालन करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने कंत्राटदाराला कायदेशीर नोटीस दिली आहे. महापौर अनिल सोले यांनीसुद्धा मनपाच्या आमसभेत कंत्राटदाराला नोटीस देण्याचे रुलींग दिले होते. सेवानियुक्त न्यायाधीशांची नियुक्ती अडकलीस्टार बसच्या संचालनासाठी करण्यात आलेल्या करारांचे उल्लंघन केल्यामुळे जबाबदार अधिकार्यांची चौकशी करण्यासाठी सेवानवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी, असे रुलींग दिले होते. यासाठी मनपाने राज्य सरकारकडे परवानगीही मागितली होती. मात्र राज्य सरकारकडून प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी)
स्टारबस ऑपरेटरला मनपाची नोटीस
By admin | Updated: May 31, 2014 00:59 IST