पाच उमेदवारांना नोटीस

By Admin | Updated: October 13, 2014 13:36 IST2014-10-13T13:35:38+5:302014-10-13T13:36:24+5:30

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत १0 पाच उमेदवारांनी खर्च कमी दाखवला म्हणून त्यांना निवडणूक आयोगाने नोटिसा बजावल्या आहेत.

Notice to five candidates | पाच उमेदवारांना नोटीस

पाच उमेदवारांना नोटीस

 

शिंदखेडा : शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत १0 उमेदवारांपैकी सर्वात जास्त प्रचार खर्च भाजपाचे उमेदवार जयकुमार रावल, तर दुसर्‍या क्रमांकाचा खर्च राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप बेडसे यांनी केल्याची नोंद आहे. 
खर्चात तिसर्‍या क्रमांकावर काँग्रेसचे श्याम सनेर असून सर्वात कमी खर्च आनंदा जयराम सैंदाणे या बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराच्या नावावर आहे. 
पाच उमेदवारांनी खर्च कमी दाखवला म्हणून त्यांना निवडणूक आयोगाने नोटिसा बजावल्या आहेत. शिंदखेडा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याच्या २0 सप्टेंबरपासून ८ ऑक्टोबरपर्यंत भाजपाचे उमेदवार रावल यांनी ९ लाख २२ हजार ६७३ रुपये खर्चकेले आहेत. 

Web Title: Notice to five candidates