एआयएमआयएमची प्रणिती शिंदे यांना नोटीस
By Admin | Updated: November 10, 2014 03:57 IST2014-11-10T03:57:33+5:302014-11-10T03:57:33+5:30
आॅल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीनने (एआयएमआयएम) आमदार प्रणिती शिंदे यांना नोटीस पाठवून माफी मागा

एआयएमआयएमची प्रणिती शिंदे यांना नोटीस
सोलापूर : आॅल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीनने (एआयएमआयएम) आमदार प्रणिती शिंदे यांना नोटीस पाठवून माफी मागा अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरे जा, अशा इशारा दिला आहे. प्रणिती शिंदे यांनी या पक्षावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात एआयएमआयएमने रविवारी ही नोटीस बजावली आहे.
विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे यांचा सामना एमआयएमच्या उमेदवाराशी झाला होता. प्रणिती शिंदे विजयी झाल्या असल्या तरी एमआयएमच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. गेल्या आठवड्यात पत्रकारांशी बोलताना आमदार शिंदे यांनी एमआयएमवर जोरदार टीका केली होती. एमआयएम पक्षाचा समाजात दुही माजविण्याचा अजेंडा असून, तो देशविरोधी आहे, असे विधान त्यांनी केले होते.
एमआयएमचे प्रमुख असोदुद्दीन ओवैसी यांनी या विधानाची दखल घेऊन प्रणिती शिंदे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. (प्रतिनिधी)