तरुणींवर छाप पाडण्याच्या नादात पोहोचले कोठडीत

By Admin | Updated: July 13, 2017 05:21 IST2017-07-13T05:21:07+5:302017-07-13T05:21:07+5:30

तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी धूम स्टाईलने स्टंटबाजी करणे दोन तरुणांना भलतेच महागात पडले आहे.

Nothing has touched the mark of the girl | तरुणींवर छाप पाडण्याच्या नादात पोहोचले कोठडीत

तरुणींवर छाप पाडण्याच्या नादात पोहोचले कोठडीत

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी धूम स्टाईलने स्टंटबाजी करणे दोन तरुणांना भलतेच महागात पडले आहे. याच स्टंटमुळे त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आली. मोहम्मद मुस्तफा नियाज खान (१८), जेध शहनवाज खान (१८) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही माझगावचे रहिवासी आहेत.
मरिन ड्राइव्ह परिसरात चार दुचाकीस्वारांचे जीवघेणे स्टंट सुरू असल्याची माहिती मरिन ड्राइव्ह पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक सोमवारी मध्यरात्री घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी दोघे पोलिसांच्या हाती लागले तर अन्य दोघांनी पळ काढला.

Web Title: Nothing has touched the mark of the girl