जिल्हा बँकेतही नोटा बदलून मिळणार

By Admin | Updated: November 11, 2016 06:20 IST2016-11-11T06:20:20+5:302016-11-11T06:20:20+5:30

राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांत इतर बँकांप्रमाणेच पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार असून, खातेदारांना आपल्या खात्यात या नोटा भरता येतील

The notes in the district bank will be changed | जिल्हा बँकेतही नोटा बदलून मिळणार

जिल्हा बँकेतही नोटा बदलून मिळणार

पुणे/ मुंबई : राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांत इतर बँकांप्रमाणेच पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार असून, खातेदारांना आपल्या खात्यात या नोटा भरता येतील, असा निर्णय रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) घेतला आहे. मात्र, पतसंस्थांना हा निर्णय लागू नसल्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले.
पैसे बदलून देण्यास खासगी व सरकारी बँकांत सुरुवात झाली. मात्र, त्यात आरबीआयने जिल्हा बँकांचा समावेश यात केला नव्हता. गुरुवारी अनेकांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये गर्दी केली होती. ही बाब सहकार आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर आरबीआयशी संपर्क साधला. आरबीआयने गुरुवारी सुधारित पत्रक काढत जिल्हा मध्यवर्ती बँकेला पैसे बदलून देण्याची मुभा दिली. (प्रतिनिधी)

पतसंस्थांना परवानगी नाही
राज्यातील पतसंस्थांना अजूनही पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारता येणार नाहीत.
राज्यात पंधरा हजार पतसंस्था आहेत. त्यांनाही नोटा बदलून देण्यास परवानगी दिल्यास अधिक नागरिकांपर्यंत पोचता येईल.
तसेच या यंत्रणेची मोठ्या प्रमाणावर मदत होईल. पतसंस्थांना अशी परवानगी दिल्यास इतर बँकांमध्ये होणारी गर्दी कमी होईल. तशी मागणी आरबीआयकडे करण्यात आली असल्याची माहिती दळवी यांनी दिली.


नामोल्लेख नसल्याने झाली पंचाईत
राज्यातील ३१ जिल्हा बँकांच्या

3746
शाखा गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे उघडल्यानंतर ५००
व १००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या. काही जिल्हा बँकांनी जुन्या नोटा स्वीकारून
त्याबदल्यात नव्या नोटा ग्राहकांना देऊ केल्या. स्पष्ट आदेश नसल्याने काही जिल्हा बँकांनी राज्य शिखर बँकेशी संपर्क साधून मार्गदर्शन मागविले. जुन्या नोटा स्वीकारण्याबाबत रिझर्व्ह बँकेने ८ नोव्हेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकात जिल्हा बँकांचा नामोल्लेख नसल्याचे कळवले.
केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात जिल्हा बँकांचा उल्लेख नसल्याचे कारण पुढे करत, या बँकांनी नोटा स्वीकारू नयेत, असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले. त्यानुसार राज्य शिखर बँकेने तसा ई-मेल सर्व जिल्हा बँकांना पाठविला. त्यानंतर व्यवहार थांबविण्यात आले. मात्र, दुपारनंतर त्यात दुरुस्ती झाली.

Web Title: The notes in the district bank will be changed