टोलमुक्तीबाबत समाधानी नाही
By Admin | Updated: June 1, 2015 04:36 IST2015-06-01T04:36:14+5:302015-06-01T04:36:14+5:30
सोमवारपासून पूर्णपणे बंद होणार आहेत. नाशिकदौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांना पत्रकारांनी शासनाच्या या निर्णयाबाबत विचारले असता ते म्हणाले, १२

टोलमुक्तीबाबत समाधानी नाही
नाशिक : सरकारने काही टोलनाक्यांवरील ‘वसुली’ थांबविली असली, तरी या टोलमुक्तीबाबत समाधानी नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले. मोठ्या रस्त्यांवरील टोल बंद होणे अपेक्षित होते. शिवाय कमी खर्चाच्या लहान रस्त्याला टोल लावताच कामा नये, असेही ते म्हणाले.
राज्यातील बारा टोलनाके सोमवारपासून पूर्णपणे बंद होणार आहेत. नाशिकदौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांना पत्रकारांनी शासनाच्या या निर्णयाबाबत विचारले असता ते म्हणाले, १२ टोलनाके बंद केले त्याबद्दल सरकारचे अभिनंदन; मात्र टोलमुक्त महाराष्ट्रासाठी सरकारने केलेला हा प्रयत्न पाहिजे तसा भरीव नसून याबाबत आपण समाधानी नाही. ज्या रस्त्यांच्या बांधकामासाठी अत्यंत कमी खर्च आला त्या रस्त्यांवर टोलनाके हवेत कशाला, हाच प्रश्न ‘मनसे’चा आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
टोलनाके शासनाने पारदर्शक करावे. तेथील कॅश पेमेंटची प्रक्रिया बंद करावी आणि टोलनाक्यांवर होणारी पैशांची उधळण थांबवावी, हीच प्रमुख मागणी असल्याचे ठाकरे म्हणाले.