शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 20:06 IST

Lok Sabha Election 2024 : किरण सामंत हे सकाळपासून नॉट रिचेबल होते, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. 

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज मतदान सुरू असतानच शिवसेना नेते किरण सामंत हे नॉट रिचेबल झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र, अखेर किरण सामंत हे समोर आले असून त्यांनी पाली या आपल्या मूळगावी मतदानाचा हक्कही बजावला. तसेच, आपल्या सीम कार्डच्या प्रॉब्लेममुळे आपण नॉट रिचेबल होतो, पण आपले ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड हे कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याची प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिली. दरम्यान, किरण सामंत हे सकाळपासून नॉट रिचेबल होते, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये यंदा चुरशीची निवडणूक होत असून भाजपकडून नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. दरम्यान, आज सकाळी मतदानाला सुरुवात होताच किरण सामंत हे नॉट रिचेबल झाल्याचे वृत्त धडकताच महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात असल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी किरण सामंत यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, मतदान संपण्यापूर्वी फक्त 15 मिनिटे आधी किरण सामंत हे आपल्या पाली या मूळ गावी मतदानासाठी आले. याठिकाणी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी किरण सामंत म्हणाले की, "सोमवारी रात्री आपण 12 वाजेपर्यंत निवडणुकीचं काम करत होतो. मंगळवारी सकाळी 8 वाजता प्रचारासाठी बाहेर पडलो. पण मोबाईलमधील सिम कार्डच्या प्रॉब्लेममुळे आपण नॉट रिचेबल होतो. पण माझ्या ड्रायव्हरचे आणि बॉडीगार्डचे मोबाईल सुरू असल्याने त्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतो."

किरण सामंत यांना पोलीस संरक्षण द्यावं, वैभव नाईकांची मागणीठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी किरन सामंतांच्या नॉट रिचेबल वृत्तावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, किरण सामंत हे कालपासून नॉट रिचेबल आहेत. आज आम्ही पोलीस महासंचालकांना  पत्र देऊन किरण सामंत यांना निवडणुकीनंतर ताबडतोब संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी  केली आहे. या आधी या मतदारसंघात दहशतवादाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे मतदान शांततेत झाल्यानंतरसुद्धा काही होऊ नये, यासाठी पोलिसांनी किरण सामंत यांना लवकरात लवकर पोलीस संरक्षण द्यावं, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक Narayan Raneनारायण राणे Vinayak Rautविनायक राऊत