लातूर नाही, ही आहे दिल्ली, काँग्रेसनं उडवली केजरीवालांची खिल्ली

By Admin | Updated: April 23, 2016 15:18 IST2016-04-23T15:18:09+5:302016-04-23T15:18:09+5:30

रोज लातूरला लाखो लिटर पाणी देण्याची तयारी दर्शवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यावर काँग्रेसने दिल्लीतली पाण्याची स्थिती दर्शवत हल्ला चढवला आहे

Not Latur, it is Delhi, Congress has stirred up the controversy with Kejriwal | लातूर नाही, ही आहे दिल्ली, काँग्रेसनं उडवली केजरीवालांची खिल्ली

लातूर नाही, ही आहे दिल्ली, काँग्रेसनं उडवली केजरीवालांची खिल्ली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - रोज लातूरला लाखो लिटर पाणी देण्याची तयारी दर्शवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यावर काँग्रेसने दिल्लीतली पाण्याची स्थिती दर्शवत हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थिती संदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी पाणी देण्याचे आश्वासन दिले. तसेच केंद्र सरकारने हे पाणी रेल्वेने महाराष्ट्रात पोचवावे असेही सांगितले. केजरीवालांच्या या दिलदारीवर त्याचवेळी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिल्ली पाण्यासाठी हरयाणावर अवलंबून असल्याचे सांगत टीका केली.
तर आता काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाउंटवर टँकरभोवती जमलेली लोकांची गर्दी असे दाखवणारा फोटो टाकला आहे, आणि हे लातूर नाही तर आपली दिल्ली आहे असं म्हटलंय. केजरीवाल तुमच्याकडे आहे का काही उत्तर, असा खोचक सवालही करण्यात आला आहे.

Web Title: Not Latur, it is Delhi, Congress has stirred up the controversy with Kejriwal