कर्तव्यदक्ष नाही, संघदक्ष सरकार !
By Admin | Updated: January 14, 2016 00:21 IST2016-01-14T00:21:22+5:302016-01-14T00:21:22+5:30
नगरपंचायत निवडणुकीत जनतेने सरकारच्या विरोधात कौल दिला आहे़ गेल्या दीड वर्षात एकही महत्त्वाचा निर्णय या सरकारने घेतला नाही़ मंदिर वही बनायेंगे, तारीख नहीं बतायेंगे असे
कर्तव्यदक्ष नाही, संघदक्ष सरकार !
नांदेड : नगरपंचायत निवडणुकीत जनतेने सरकारच्या विरोधात कौल दिला आहे़ गेल्या दीड वर्षात एकही महत्त्वाचा निर्णय या सरकारने घेतला नाही़ मंदिर वही बनायेंगे, तारीख नहीं बतायेंगे असे म्हणून भूलथापा देण्यात येत असून हे सरकार कर्तव्यदक्ष नसून संघदक्ष असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी मालेगाव येथे केली़
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी कासारखेडा, मालेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते़ ते म्हणाले, निवडणुकीपूर्वी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये येणार असल्याचे आश्वासन दिले होते़ १५ पैसेही कुणाच्या खात्यात आले नाहीत.एकीकडे आत्महत्या होत असताना बँकाकडून वसुलीही सुरू आहे़ आता अच्छे दिन येणार नाहीत, हे जनतेला माहीत झाले आहे़ त्यामुळे जुने दिवसच बरे होते, ते तरी परत येवू द्या, असे म्हणावे लागत आहे़