शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोट मिळत नाही म्हणून मुंबईच्या जावयाचा चाकूहल्ला, सासू ठार, पत्नी गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:27 IST

पत्नीसोबत घटस्फोट मिळत नाही म्हणून माण तालुक्यातील कुकुडवाड येथे मुंबईच्या जावयाने सासूसह पत्नीवर चाकूने सपासप पाच वार केले. यामध्ये सासू रंजना भोसले (वय ५५) या जागीच मृत्यू पावल्या तर पत्नीही गंभीर जखमी झाली. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री घडली. हत्या केल्यांनतर आरोपी गावाच्या परिसरातच निवांतपणे भटकत राहिला.

ठळक मुद्देघटस्फोट मिळत नाही म्हणून मुंबईच्या जावयाचा सासरवाडीत चाकू हल्लापत्नीही गंभीर, सासूची हत्या करून निवांतपणे भटकंती

म्हसवड : पत्नीसोबत घटस्फोट मिळत नाही म्हणून माण तालुक्यातील कुकुडवाड येथे मुंबईच्या जावयाने सासूसह पत्नीवर चाकूने सपासप पाच वार केले. यामध्ये सासू रंजना भोसले (वय ५५) या जागीच मृत्यू पावल्या तर पत्नीही गंभीर जखमी झाली. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री घडली. हत्या केल्यांनतर आरोपी गावाच्या परिसरातच निवांतपणे भटकत राहिला.

आबासो बबन काटकर (वय ४०) असे खुनाचा आरोप असलेल्या जावयाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नरवणे येथील आबासो काटकर हा ठाणे येथील दिवा परिसरात पत्नी वैशाली आणि दोन लहान मुलांसह राहत आहे. तो बीएसटीत मेकॅनिकल विभागात नोकरी करत आहे. पत्नी वैशाली व त्यांच्यात काही वर्षे सातत्याने वाद होत होता.पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याने वैशाली माण तालुक्यातील कुकुडवाड येथे माहेरी आली होतीे. त्यानंतर गुरुवारी आबासो काटकर हा सासरवाडीत गेला. घटस्फोट मिळावा म्हणूून त्याने सासू व पत्नीसोबत भांडण सुरू केले.

याच दरम्यान आबासो याने सासू रंजना भोसले यांच्यासह पत्नी वैशालीवरही चाकूने सपासप वार केले. जबडा, मान, छाती अन् पोट या ठिकाणी जखमा झाल्याने सासू जागीच मृत्यू पावली. तर पत्नी वैशालीही गंभीर जखमी झाली.

यावेळी त्यांना वाचविण्यास आलेल्या पूनम भोसले या भावजयीलाही त्याने ढकलून दिले. त्यानंतर तेथून तो पळून गेला. तसेच हत्या केल्यांनतर तो गावाच्या परिसरातच निवांतपणे भटकत राहिला.या घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलिसांनी आरोपी आबासो काटकर याला गावच्या रस्त्यावर तत्काळ अटक केली. म्हसवड पोलीस ठाण्यात पूनम भोसले या भावजयने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, म्हसवड येथील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा