शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 16:38 IST

संजय राऊतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांनी अमित शाह आमचे नेते असल्याचे म्हटलं.

Sanjay Shirsat: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बऱ्याच काळाने दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मात्र राज ठाकरे यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी ही सदिच्छा भेट होती असं म्हटलं. दुसरीकडे या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवरुन शिवसेना शिंदे गटाला टोला लगावला. एकनाथ शिंदे यांचा पक्ष अमित शहा आणि मोदी चालवतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. राऊतांच्या या टीकेला शिंदे सेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे शिवतीर्थवर स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी आले असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनीही भेटीत राज ठाकरेंबरोबर निवडणुकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं म्हटलं. यावरुन बोलताना संजय राऊत यांनी अमित शाह हे शिंदे गटाच्या पक्षाचे प्रमुख आहेत. अमित शाह आणि मोदीच राज्यातील तिन्ही पक्ष चालवतात, अशी टीका केली. त्यावर प्रत्युत्तर देताना टीव्ही९ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय शिरसाट यांनी अमित शाह हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत असं म्हटलं.

"चला आमच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत. त्याचा तुम्हाला काय त्रास आहे. नालायकांनो तुम्ही काश्मीरला जाऊन राहुल गांधींची गळाभेट घ्यायचा प्रयत्न करता. ते तुमच्या पक्षाचे कोण आहेत. त्यांच्यावर उद्धव ठाकरे टीका करत होते ना. शरद पवार तुमच्या प्रमुख नाहीत का. म्हणून आम्ही अमित शाह आणि पंतप्रधान मोदींनाही मानतो. त्यांचे मार्गदर्शन घेऊन आम्ही आमच्या पक्षाची वाटचाल यशस्वीरित्या पुढे चालू ठेवली आहे. म्हणून आम्हाला अमित शाह हे आमचे नेते आहेत हे सांगायला सुद्धा लाज वाटत नाही," असं संजय शिरसाट म्हणाले.

इतरांची मदत घेतली तर काय झालं?

"ताकद वाढवण्यासाठी आम्ही इतरांची मदत घेतली तर काय झालं? एकनाथ शिंदे हे संवाद ठेवणारे नेते आहेत. ज्यांना पक्षाचं काही देणं घेणं नाही, ते लोक दुसऱ्यांच्या पक्षात डोक घालण्याचं काम करत आहेत," अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर दिली.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटAmit Shahअमित शाहEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊत