नोटाबंदीचा फटका बिस्कीट उद्योगाला
By Admin | Updated: December 25, 2016 19:27 IST2016-12-25T19:27:00+5:302016-12-25T19:27:00+5:30
नोटाबंदीच्या निर्णयामुळे बिस्किटांच्या व्यवसायाच्या वाढीलाही फटका बसला.

नोटाबंदीचा फटका बिस्कीट उद्योगाला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - नोटाबंदीच्या निर्णयामुळे बिस्किटांच्या व्यवसायाच्या वाढीलाही फटका बसला. ही वाढ १.५ टक्क्यांनी खाली आली असल्याचे प्रसिद्ध उत्पादक पार्ले प्रोडक्ट्सने म्हटले आहे. २०१६मध्ये या व्यवसायाची वाढ गेल्या दोन महिन्यांत (नोटाबंदीच्या निर्णयानंतर) ५ टक्क्यांची होती. मान्सूननंतर बिस्किटांच्या खपाला वेग आला होता. परंतु नोटाबंदीनंतर तो मंदावला, असे पार्ले प्रोडक्ट्स कॅटागिरीचे प्रमुख मयांक शाह यांनी सांगितले.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे ग्राहकांतून मागणी कमी झाली आणि व्यापारात भांडवलाचे फिरणे घटल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये पुरेशा संख्येत नव्या चलनी नोटा येत नाहीत तोपर्यंत अशीच परिस्थिती राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.