नोटाबंदी; काँग्रेस करणार आंदोलन

By Admin | Updated: December 28, 2016 02:14 IST2016-12-28T02:14:01+5:302016-12-28T02:14:01+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना ५० दिवसांची मुदत मागितली होती. त्यानंतर सर्व सुरळीत होईल, असे आश्वासनही दिले होते. पंतप्रधानांचा

Nostalgia; Congress will protest | नोटाबंदी; काँग्रेस करणार आंदोलन

नोटाबंदी; काँग्रेस करणार आंदोलन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना ५० दिवसांची मुदत मागितली होती. त्यानंतर सर्व सुरळीत होईल, असे आश्वासनही दिले होते. पंतप्रधानांचा हा दावा फोल ठरल्याने काँग्रेसच्या वतीने ५ जानेवारी रोजी राज्यभर सरकारी कार्यालयांसमोर निदर्शने व ८ जानेवारी रोजी घंटानाद व थाळीनाद आंदोलन करणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.
अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दादरच्या टिळक भवन कार्यालयात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीस प्रभारी मोहन प्रकाश, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, नारायण राणे, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव मोघे, विजय वडेट्टीवार, मधुकरराव चव्हाण, हुसेन दलवाई, भाई जगताप यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत नोटाबंदी, आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांबाबत चर्चा झाली.

Web Title: Nostalgia; Congress will protest