उत्तर सोलापुरात भाजपा-राष्ट्रवादीत आघाडी

By Admin | Updated: February 10, 2017 01:46 IST2017-02-10T01:46:41+5:302017-02-10T01:46:41+5:30

जिल्हा परिषद, तालुका पंचायती निवडणुकीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उत्तर तालुक्यापुरती राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली आहे

North-Solapur BJP-NCP alliance | उत्तर सोलापुरात भाजपा-राष्ट्रवादीत आघाडी

उत्तर सोलापुरात भाजपा-राष्ट्रवादीत आघाडी

बाळासाहेब बोचरे , सोलापूर
जिल्हा परिषद, तालुका पंचायती निवडणुकीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उत्तर तालुक्यापुरती राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही परिस्थितीत आम्ही भाजपासोबत आघाडी करणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले होते. असे असतानाची इथे आघाडी झाली.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उत्तर सोलापूरमध्ये आघाडी करून राष्ट्रवादीला जि. प. व पंचायत समितीची प्रत्येकी एक जागा सोडली असून, भाजपाला पंचायत समितीच्या तीन व जि. प. ची एक जागा सोडण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यासोबत राष्ट्रवादीची बोलणी फिसकटल्यानंतर राष्ट्रवादीने भाजपाबरोबर आघाडीचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे तर पंचायत समितीसाठी भाजपाकडून जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या वहिणी संध्याराणी इंद्रजित पवार या आघाडीचे प्रमुख उमेदवार आहेत.

Web Title: North-Solapur BJP-NCP alliance