शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

ईशान्य भारत हा देशाचा मुख्य भाग

By admin | Published: February 04, 2016 1:22 AM

ईशान्य भारतात लोकवस्ती कमी असल्याने संसदेत या भागातील प्रतिनिधी तुलनेने कमी आहेत. परंतु, ईशान्येकडील आठही राज्ये भारताचे महत्वाचे अंग असून, ईशान्य भारत हा देशाचा मुख्य भाग

पुणे : ईशान्य भारतात लोकवस्ती कमी असल्याने संसदेत या भागातील प्रतिनिधी तुलनेने कमी आहेत. परंतु, ईशान्येकडील आठही राज्ये भारताचे महत्वाचे अंग असून, ईशान्य भारत हा देशाचा मुख्य भाग असल्याची भावना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली. माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूह व भारत अस्मिता फौंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष व भारत अस्मिता फाऊंडेशनचे समन्वयक प्रा. राहुल कराड, एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे सचिव व कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश कराड उपस्थित होते.रिजिजू म्हणाले, ‘‘राजकारणात काम करताना अनेक अडचणी येतात. राजकारण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लोकशाहीमुळे आपले स्वातंत्र्य आणि आवाज अबाधित असल्यानेच आपल्या देशात सहिष्णुतेचे वातावरण आहे. आवाज आणि स्वातंत्र्य दाबले गेले, तर कालांतराने त्याचा स्फोट होतो आणि अरब देशांप्रमाणे हिंसाचार वाढतो. अनेकदा आपल्या ताकदीला आपणच ओळखत नाही, आपल्या देशाची महानता आपण ओळखायला हवी. जाती-धर्मावरुन होणारे भेद दूर व्हायला हवेत. देशाच्या विकासासाठी तो एकमेव मार्ग आहे.’’ पुरस्कारार्थी डॉ. आशिष नंदा आणि मिलिंद कांबळे यांनीही मनोगत व्यक्त करताना देशातील युवकांकडून येत्या काळात अनेक अपेक्षा असून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या विकासाच्यादृष्टीने केला पाहीजे असे सांगितले. (प्रतिनिधी)