दहावी, बारावीच्या बहिस्थ विद्यार्थ्यांची नावनोंदणी सुरू
By Admin | Updated: June 30, 2015 02:48 IST2015-06-30T02:48:11+5:302015-06-30T02:48:11+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी व मार्च २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेला बहिस्थ पद्धतीने अर्ज

दहावी, बारावीच्या बहिस्थ विद्यार्थ्यांची नावनोंदणी सुरू
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी व मार्च २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेला बहिस्थ पद्धतीने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावनोंदणी सुरू झाली आहे.
विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज व माहिती पुस्तिका विभागीय मंडळ कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. फेब्रुवारी व मार्च २०१६ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना विनाविलंब शुल्कासह अर्ज क्र. १७ भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत आहे. तर विलंब शुल्क भरून विद्यार्थी १० आॅगस्टपर्यंत अर्ज जमा करू शकतात. अतिविलंब शुल्क १० सप्टेबरपर्यंत भरता येईल, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.