आता २१ दिवसांत मिळेल एनओसी
By Admin | Updated: July 11, 2015 16:24 IST2015-07-11T16:22:53+5:302015-07-11T16:24:19+5:30
नागरिकांना यापुढे 'ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) अवघ्या २१ दिवसांत मिळू शकणार आहे.

आता २१ दिवसांत मिळेल एनओसी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - राज्यातील नागरिकांना यापुढे 'ना हरकत प्रमाणपत्र' ( एनओसी) अवघ्या २१ दिवसांत मिळू शकणार आहे. एनओसी व इतर कागदपत्रे मिळण्यासाठी २१ दिवसांचा कालावाधी निश्चित करण्यात आला असून त्यामुळे आता नागरिकांना कगादपत्रांसाठी सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागणार नाहीत व त्यांचा मनस्तापही टळेल.
राज्याच्या गृह विभागाने यासंदर्भात जारी केलेल्या अध्यादेशानुसार १७ प्रकारच्या सेवांचा समावेश करण्यात आला आहे. जर नागरिकांकडे योग्य ती सर्व कागदपत्र असतील तर त्यांना अवघ्या २१ दिवसांत 'ना हरकत प्रमाणपत्र' मिळेल. आणि जर दिलेल्या वेळेत ही कागदपत्रे मिळाली नाहीत तर संबंधित अधिका-याला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात येईल.