शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

'या मंडळींना आवरा'; शिवाजी महाराज- मोदी बरोबरीवरून शिवेंद्रराजेंनी दिली समज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 11:40 IST

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करणाऱ्या 'आज के शिवाजी' या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करणाऱ्या 'आज के शिवाजी' या पुस्तकावरून मोठा वाद संजय राऊत, छगन भुजबळांसारख्या नेत्यांनी भाजपावर केली टीका शिवेंद्रराजे भोसलेंनीही यावरून भाजपालाच घरचा आहेर दिला आहे.

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करणाऱ्या 'आज के शिवाजी' या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर संजय राऊत, छगन भुजबळांसारख्या नेत्यांनी भाजपावर टीका केली आहे. तर शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या शिवेंद्र राजे भोसलेंनीही या पुस्तकावर लागलीच बंदी घाला, अशी मागणी भाजपा नेतृत्वाकडे केली आहे. शिवेंद्रराजे भोसलेंनीही यावरून भाजपालाच घरचा आहेर दिला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्यासह देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर पुरुषांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. बऱ्याच वेळेला पक्षामध्ये अतिउत्साही कार्यकर्ते असतात. ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असले प्रकार होतात. त्यामुळे पक्ष नेतृत्वावर चिखलफेक आणि आरोप करण्याची संधी विरोधकांना मिळते. अशा अतिउत्साही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवर घाला, अशी मी पक्षनेतृत्वाला विनंती करत आहे. त्यांना योग्य ती समज द्या. या पुस्तकाचं प्रकाशन झालं असलं तर ते थांबवावं किंवा ते पुढे वितरीत करू नये, असंही शिवेंद्र राजे भोसले म्हणाले आहेत. मोदी आणि शिवरायांची तुलना राज्यातल्या भाजपा नेत्यांना मान्य आहे का?; शिवसेनेचा सवाल

मोदींची तुलना शिवरायांशी, भाजपच्या पुस्तकावर संताप; शिवप्रेमींकडून टीकेची झोड

दरम्यान, 'आज के शिवाजी' या वादग्रस्त पुस्तकावरून भाजपाला धारेवर धरणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजही भाजपाला लक्ष्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना राज्यातल्या भाजपा नेत्यांना मान्य आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सर्व मुद्द्यांवर लगेच भूमिका मांडणारे भाजपा नेते शिवराय आणि मोदींच्या तुलनेवर संध्याकाळपर्यंत स्वत:ची भूमिका मांडतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजचे शिवाजी महाराज आहेत, असं मजकूर असलेलं 'आज के शिवाजी'  या पुस्तकाचे रविवारी दिल्ली येथील भाजपा कार्यालयात प्रकाशन झालं होते. त्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. तसेच या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. 

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन छत्रपती संभाजीराजे संतप्त; म्हणाले...

शाब्बास भाजपा; 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी'वरुन शिवसेनेचा खोचक टोला

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले