आता शेतक-यांना भारनियमनाचे ‘नो टेंशन’!

By Admin | Updated: December 29, 2014 00:42 IST2014-12-28T23:53:26+5:302014-12-29T00:42:44+5:30

पाच वर्षांत पाच लाख सौर उज्रेवर आधारीत कृषी पंप बसविणार, शेतक-यांचा होणार सोशो- एकॉनॉमिक सर्वे.

'No Tension' to the farmers now! | आता शेतक-यांना भारनियमनाचे ‘नो टेंशन’!

आता शेतक-यांना भारनियमनाचे ‘नो टेंशन’!

विवेक चांदूरकर /अकोला: विद्युत पुरवठा नाही, सततचे भारनियमन तसेच रोहित्र जळाल्यामुळे शेतकरी आता सिंचनापासून वंचित राहणार नाहीत. शासनाने सौर उज्रेवर आधारीत कृषीपंप राज्यभरातील शेतकर्‍यांच्या शेतातील विहिरीवर लावण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात पाच वर्षांत पाच लाख शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणार आहे. देशात सध्या प्रामुख्याने कोळसा, पाणी व अणू यापासून उर्जा निर्मिती केली जाते. मात्र, कोळसा व पाण्याची उपलब्धता र्मयादीत असल्यामुळे उर्जा निर्मितीवर र्मयादा येत आहे. त्यामुळे शासनाने आता सौर उज्रेवर भर देण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. शेतीत तंत्रज्ञान आणण्याचे आटोकाट प्रयत्न देशभर होत असताना राज्य शासनाने महाराष्ट्राची शेती तंत्रज्ञानयुक्त करण्याचा विडा उचलला आहे. त्यानुसार शेतातील सिंचनाचे तंत्रज्ञानावर आधारीत रूपांतर करण्याकरिता विहिरीवरील तसेच विंधन विहिरीवरील पंप यापुढे सौर उज्रेवर चालविण्यात येणार आहे. त्याकरिता तालुकानिहाय शेतकर्‍यांचा समूह (क्लस्टर) बनविण्यात येणार आहे. एकाच भागात ओलित व कोरडवाहू शेती असते. त्यामुळे यानुसार शेतकर्‍यांचे क्लस्टर तयार करून त्यानुसार सौर उज्रेवरील पंपाचे वाटप करण्यात येणार आहे. शेतात पंप लावून सुरू होईपर्यंतची जबाबदारी शासनाचीच राहणार आहे. सदर पंप खरेदी करून शेतकर्‍यांच्या शेतात विहिरीवर लावून देण्यात येणार आहे. तोपर्यंतचा सर्व खर्च शासन करणार असून, शेतकर्‍यांकडून नाममात्र शुल्क घेण्यात येणार आहे. कृषी पंप लावण्याची जबाबदारी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांवर सोपविण्यात येणार आहे.

*वीज पोहोचली नसलेल्या भागातही सौर उज्रेवरीलच वीज ज्या गावांमध्ये अद्याप वीज पोहोचली नाही. त्या ठिकाणी विद्युत खांब व तारेचा खर्च करण्याऐवजी हाच पैसा सौर उज्रेवर आधारीत विद्युत उपकरणांवर खर्च केला जाणार आहे. त्यामुळे अशा गावांमध्ये सौर उज्रेवर आधारीत विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे.

*शेतकर्‍यांचा सोशो, एकॉनॉमिक सर्वे होणार महसूल व कृषी विभागाच्या वतीने शेतकर्‍यांचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पाण्याची यासोबतच प्रत्येक गावात शेतकर्‍यांना सिंचनाची पिकनिहाय पाण्याची मागणीही लक्षात घेतली जाणार आहे. यामध्ये कोणत्या शेतकर्‍याकडे किती शेती आहे, तो कोणते पीक घेतो व त्याला किती पाण्याची गरज आहे. त्याचा पुरवठा कोठून होवू शकतो, याची माहितीही घेण्यात येणार आहे.

*तालुका स्तरावर सव्र्हीस सेंटर राहणार शेतात सौर उज्रेवर आधारीत कृषी पंप बसविण्यात आल्यानंतर त्यामध्ये बिघाड आला तर शेतकर्‍यांना चिंता करण्याची गरज नाही. कारण तालुकास्तरावर सव्र्हीस सेंटर उघडण्यात येणार आहे. कृषी पंपात बिघाड आला तर या सेंटरमधील कर्मचारी शेतात जावून पंप दुरूस्त करून देणार आहेत.

Web Title: 'No Tension' to the farmers now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.