शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटप जाहीर होईना, दिग्गज नेत्यांच्या फक्त बैठकांचा सिलसिला

By दीपक भातुसे | Updated: March 26, 2024 07:00 IST

काही जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीतील एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा सांगितल्याने जागावाटप पुढे सरकण्यास तयार नाही.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ दोन दिवस शिल्लक आहेत, तरीही महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम आहे.काही जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीतील एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा सांगितल्याने जागावाटप पुढे सरकण्यास तयार नाही.

काही जागांवर बंडखोरी शमवण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासंदर्भातही बैठकांचा सिलसिला सुरू आहे. महायुतीला तीन मतदारसंघांत बंडखोरीची डोकेदुखी भेडसावत असून त्यासंदर्भात बैठका होऊनही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे नुसत्याच चर्चा पण काेणाचेही काहीच ठरेना, अशी स्थिती आहे. 

जागावाटपाचा तिढा सोडवण्याबरोबरच प्रकाश आंबेडकरांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गटाची) मातोश्रीवर महत्त्वाची बैठक झाली. राष्ट्रवादीकडून स्वतः शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. सुनील भुसारा तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत उपस्थित होते. त्यानंतरही जागांच्या फॉर्म्युल्याची घोषणा झाली नाही.

सर्वपक्षीय वरिष्ठांना बंडखोरीची डोकेदुखी महाविकास आघाडीत बारामती, नगर, नाशिक, सातारा या मतदारसंघांत मित्रपक्षांच्या बंडखोरीच्या पवित्र्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. ही बंडखोरी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार स्वतः प्रयत्न करत आहेत. नगरमध्ये विखे-पाटील विरुद्ध राम शिंदे या भाजप नेत्यांनी तर, बारामतीत शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले आहेत. नाशिक मतदारसंघावर शिंदे गट आणि भाजपच्या स्थानिक आमदारांनी दावा सांगितला आहे, तर साताऱ्यातून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर उदयनराजेंना लढू देणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला आहे.

अजित पवार गट सहा जागांवर ठामबारामती, सातारा, रायगड, शिरुर या चार जागांव्यतिरिक्त धाराशिव आणि परभणी यासह सहा जागा मिळाव्यात, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाम आग्रह आहे. बुलढाणा, नाशिक या जागांसाठीही राष्ट्रवादीने आग्रह धरला आहे. मात्र, या जागा मिळाल्या नाहीत तरी चालेल, अशी पक्षाची भूमिका असल्याचे समजते. महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादीला लक्षद्वीपची जागा मिळणार आहे. 

जानकर बारामतीतून?रासपचे महादेव जानकर महायुतीबरोबर आल्याने त्यांना एक जागा दिली जाणार आहे. ही जागा परभणी की बारामती याबाबत चर्चा सुरू झाली आहे. बारामतीमध्ये तीन दिवस अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार थंडावल्याने या जागेवर जानकर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती