शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
3
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
4
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
5
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
7
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
8
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
9
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
10
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

Maharashtra Coronavirus News: कोरोना संकटात ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; ३० जूनपर्यंत लागू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 6:44 PM

CoronaVirus News : No Routine transfers till 30th June Thackeray government passes order amid corona crisis :- कोरोना परिस्थितीत मंत्रालयातील कर्मचाऱ्यांवर ताण येऊ यासाठी महत्त्वाचा आदेश जारी

मुंबई: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांत काहीसा कमी होताना दिसत आहे. मात्र प्रशासनावरील ताण कमी झालेला नाही. पुढील काही दिवस परिस्थितीत फारसा बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे १५ मेपर्यंत असलेला लॉकडाऊनदेखील वाढण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या मध्यापासून राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. १५ मेपर्यंत राज्यात निर्बंध लागू असतील. मात्र या कालावधीत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली नाही. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत. त्यामुळे नियमित बदल्या रोखण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. Maharashtra Lockdown :- No Routine transfers till 30th June Thackeray government passes order amid corona crisisरामबाण उपाय! देशाचा 'हनुमान' आला कामी; कोरोना संकटात मिळाली 'संजीवनी'राज्यातील कोरोनाचा Corona Virus वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नयेत असे आदेश सामान्य प्रशासन विभागानं काढले आहेत. सरकारच्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या दर ३ वर्षांनी केल्या जातात. मात्र सध्या कोरोना संकटामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांवर ताण आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या न करण्याचा अध्यादेश काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील दीड महिना तरी रुटिन बदल्या होणार नाहीत.कोरोनाचा कहर रोखण्यासाठी नाशकात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन३० जूनपर्यंत रुटिन बदल्या केल्या जाणार नाहीत. मात्र आपत्कालीन बदल्या केल्या जाऊ शकतात. सेवानिवृत्तीमुळे रिक्त भरलेली पद भरणं, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पद भरणं, शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात गंभीर स्वरुपाची साधार तक्रार प्राप्त झाल्यामुळे बदली करणं असे निर्णय घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन वेळोवेळी याबद्दल पुढील आदेश काढले जाणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या