शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

सुविधा देण्यात रेल्वे ‘नापास’

By admin | Updated: August 1, 2016 04:47 IST

लोकलचे वेळापत्रक सुधारण्यात आणि सुविधा देण्यात उपनगरीय रेल्वे यंत्रणा अपयशी ठरत आहे.

सुशांत मोरे,

मुंबई- लोकलचे वेळापत्रक सुधारण्यात आणि सुविधा देण्यात उपनगरीय रेल्वे यंत्रणा अपयशी ठरत आहे. त्याचे पडसाद प्रवाशांच्या आंदोलनांतून उमटत आहेत, असे ताशेरे कॅगच्या (नियंत्रक व महा लेखापरीक्षक) अहवालातून उपनगरीय रेल्वे यंत्रणांवर ओढण्यात आले आहेत. देशभरातील उपनगरीय रेल्वेच्या कामगिरीची माहिती घेऊन त्याचा अहवाल ‘कॅग’कडून तयार करण्यात आला. हा अहवाल नुकताच संसदेसमोर ठेवण्यात आला. त्यातून ही माहिती समोर आली. महत्वाची बाब म्हणजे २0१0 ते २0१५ या काळात देशभरातील एकूण आंदोलनांपैकी मुंबईतील मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवर २८ तर पश्चिम रेल्वेवर १७ विविध आंदोलने झाली आहेत. उपनगरीय रेल्वे सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र सुविधांची व वक्तशीरपणाची कमतरता, त्यामुळे विस्कळीत होत असलेली उपनगरीय सेवा पाहता त्याचा परिणाम प्रवास करणाऱ्या लाखो उपनगरीय प्रवाशांवर होत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येत असून त्याचा फटका रेल्वेच्या मालमत्तांना बसत असल्याचे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सेवा आणि कार्यक्षमता याबाबत उपनगरीय रेल्वे यंत्रणेला वेळोवेळी सूचना प्राप्त झाल्या आहेत. देशभरातील उपनगरीय सेवा असलेल्या सात क्षेत्रीय रेल्वेच्या सूचनांची माहीती घेतली असता २0१0 ते २0१५ पर्यंत तब्बल १३ हजार २६0 महत्वाच्या विविध तक्रारी रेल्वेकडे प्राप्त झाल्या आहेत. सर्वाधिक तक्रारी मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील आहेत. मध्य रेल्वेवरील सात हजार तक्रारी असून यात स्थानकांवर कमी दर्जाच्या सुविधा असल्याबाबतच्या ४ हजार ४२२ तक्रारींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पश्चिम उपनगरीय रेल्वेवरीलही ३ हजार ४२१ तक्रारी प्राप्त झाल्या असून यात लोकलमधील सुविधांबाबतच्या सर्वाधिक ५६६ तक्रारी असल्याचे नमूद आहे. २0१0 ते २0१५ या काळात देशभरातील उपनगरीय स्थानकांवर ३४८ आंदोलने झाली असून यामध्ये मध्य रेल्वेवर २८ तर पश्चिम रेल्वेवर १७ आंदोलनाचा समावेश असल्याचे कॅगच्या अहवालातून समोर आले आहे. (प्रतिनिधी)मालमत्तेचे २0१0 ते २0१५ या काळात ५७ लाख १९ हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे.मध्य रेल्वे- ४८ लाख ५0 हजार रुपयेपूर्व रेल्वे- ४ लाख ३४ हजारदक्षिण मध्य रेल्वे- ३ लाख ९९ हजारदक्षिण रेल्वे- ३६ हजार