शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेसोबत एकत्र येण्यास तयार; चंद्रकांत पाटलांच्या विधानावर फडणवीस म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 17:33 IST

चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत एकत्र येण्याबद्दल केलेल्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांचं भाष्य

मुंबई: आगामी काळात शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास राज्याच्या हितासाठी एकत्र यायला तयार आहोत. पण निवडणुका वेगळ्या लढू असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलं आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना-भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेबद्दल केलेलं विधान देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढलं आहे. 'चंद्रकांत पाटील शिवसेनेसोबत जे बोलले, ते त्यांनी एका प्रश्नाला दिलेलं उत्तर होतं. आम्ही पुढील निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. त्यामुळे आमच्याकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही. त्यांच्याकडूनही आम्हाला प्रस्ताव मिळालेला नाही,' असं फडणवीस म्हणाले आहेत.काल भाजपाच्या कार्यकारणीची बैठक घेतली. त्याबद्दलची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. येणाऱ्या काळात स्वबळावर सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावं असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी सांगितलं. त्यामध्ये आम्ही यापुढे राज्यात कोणतीही निवडणूक एकत्र लढणार नाही, वेगळी लढणार, निवडणुकीनंतर एकत्र येण्यावर चर्चा होईल. मात्र अद्याप ४ वर्ष आहेत. यादरम्यान शिवसेनेच्या बाजूनं प्रस्ताव आला तरी निवडणूक वेगळी लढू, प्रस्ताव आल्यास केंद्रीय नेतृत्व विचार करेल. केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिल्यास आम्ही एकत्रही येऊ,' असं त्यांनी सांगितलं.सध्या आम्ही प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहोत, कोरोना काळात जो भ्रष्टाचार सरकारनं केला त्याचा बुरखा फाडणार आहोत. ४ महिन्याच्या कालावधीत जे छुप्या पद्धतीने काम केलं आहे, ते माहिती अधिकारातून बाहेर काढू, आंदोलन करू, प्रमुख आणि प्रबळ अपक्ष १९ आणि भाजपा १०५ मिळून विरोधी पक्षाचं काम करू, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा