शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 17:10 IST

"५ जुलैचा मोर्चा केवळ भव्य मोर्चा नसेल, तर महा भव्य मोर्चा असेल. तसेच,  हिंदीला विरोध नसला, तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

संध्या संपूर्ण राज्यात पहिलीच्या वर्गापासूनच 'हिंदी भाषा' सक्तीची करण्यावरून जबरदस्त राजकारण सुरू झाले आहे. खरे तर, राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याविरोधात आज आझाद मैदान परिसरात आंदोलन करत शिवसेना ठाकरे गटाकडून राज्य सरकारने काढलेल्या हिंदी सक्तीच्या जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. यानंतर, यामुद्द्यावरून आता पाच तारखेला मोर्चाचेही आयोजन करण्यात आला आहे. या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना, "५ जुलैचा मोर्चा केवळ भव्य मोर्चा नसेल, तर महा भव्य मोर्चा असेल. तसेच,  हिंदीला विरोध नसला, तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.

उद्यापासून राज्य सरकारचे विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच ठाकरे गटाने हे आंदोलन केले आहे. यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्ही सरकारवर कसलाही दबाव आणू इच्छित नाही. आम्ही हे स्वीकारतच नाही. त्यामुळे एखादी गोष्ट ते लादत असतील, तर आम्ही आमच्या वतीने हा विषय संपवला आहे. आम्ही  या जीआरची होळी केली आहे. त्यामुळे आता तो जीआर आहे, असे मानण्याचे कारण नाही. मी वारंवार म्हटले आहे की, हिंदीला विरोध नसला, तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही."

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत? असा प्रश्न एका पत्रकारने केला असता, ठाकरे म्हणाले, "आनंदाची गोष्ट आहे. कुणी तरी एक जण धाडस दाखवत आहे. सर्वच जण गुलाम झालेले नाहीत. त्याबद्दल कौतुक आहे. मोर्चा कशाकाढी काढावा लागत आहे, हे त्यांच्या लक्षात आलेले नाहीये. महाराष्ट्रात मराठीवरते हा जो काही अत्याचार होत आहे, मी असे म्हणेन की, मुलांवर त्या वयात आपण किती भार टाकणार? हा सुद्धा एक विषय आहे."

तज्ज्ञांच्या समिती स्थापनेसंदर्भातील चर्चेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "त्यावेळेला आम्ही एक अभ्यासगट केला होता. मात्र त्याचे पुढे काय झाले? यासंदर्भात काहीच कुणी सांगत नाही. त्याची एकही बैठक झाली नाही. आणि कुणी अभास न करता हा निर्णय अचानकपणे का लादला गेला? हा कुणी लादला? कुणाचा दुराग्रह आहे? हे सुद्धा अजित पवारांनी जाहीर केलं तर बरं होईल."

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेhindiहिंदीShiv SenaशिवसेनाState Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवार