मंत्रिपदासाठी कोणाचेही नाव सुचविलेले नाही
By Admin | Updated: November 22, 2015 01:49 IST2015-11-22T01:49:42+5:302015-11-22T01:49:42+5:30
राज्य मंत्रिमंडळात पत्नी किंवा मुलाला मंत्रिपद मिळावे, असा आग्रह धरलेला नाही. आंबेडकर चळवळ देशभर वाढावी, यासाठी केंद्रातच राहणार असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी

मंत्रिपदासाठी कोणाचेही नाव सुचविलेले नाही
पुणे : राज्य मंत्रिमंडळात पत्नी किंवा मुलाला मंत्रिपद मिळावे, असा आग्रह धरलेला नाही. आंबेडकर चळवळ देशभर वाढावी, यासाठी केंद्रातच राहणार असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त
केले.
सिंबायोसिसच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या उद्घाटनासाठी शनिवारी ते पुण्यात आले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, कुटुंबातीलच नव्हे, तर कुणाचेही नाव मंत्रिपदासाठी सुचविले नाही. मंत्रिपदासाठी राज्यात यावे, असा मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे. पण, महाराष्ट्रात आल्यावर कुणा कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये, ही भूमिका आहे. दिल्लीत मंत्रिपद मिळावे, हीच अपेक्षा आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निरोपाची वाट पाहत आहे.
५ टक्के कोट्याप्रमाणे मंत्रिपद आणि महामंडळात प्रतिनिधित्व मिळावे, असा आग्रह आहे.
लंडन दौऱ्यात ड्रेसवरून बरीच चर्चा झाली, फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाले. फॅशन आयकॉन म्हणून चर्चा झाली, यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, मला जे आवडते ते मी करतो. त्याविषयी कुणी काय बोलावे, याला महत्त्व देत नाही. लंडन दौऱ्यामध्ये छत्री नेमकी कुण्याच्या डोक्यावर धरली होती, यावरही सोशल मीडियावर चर्चा झाली. तेथे पाऊस होता म्हणून स्वत:च्याच डोक्यावर छत्री धरली होती.