कोणी सांगून बलात्कार करायला जात नाही
By Admin | Updated: June 5, 2014 23:54 IST2014-06-05T23:54:10+5:302014-06-05T23:54:10+5:30
उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे येथील अखिलेश यादव सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असताना, मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौर हे मात्र त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत़

कोणी सांगून बलात्कार करायला जात नाही
>भोपाळ : उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे येथील अखिलेश यादव सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असताना, मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौर हे मात्र त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत़ कोणी सांगून तर बलात्कार करायला जात नाही ना, अशी मुक्ताफळे उधळत त्यांनी उत्तर प्रदेश सरकारचा बचाव केला आह़े
गुरुवारी काही पत्रकारांसोबतच्या चर्चेदरम्यान गौर यांनी ही मुक्ताफळे उधळली़ मी बलात्कार करायला चाललो आहे, असे कुणी आम्हाला सांगून जात नाही़ असे झाले असते तर त्याला लगेच पकडता आले असत़े, असे ते म्हणाल़े बलात्काराच्या घटना या ट्रॅफिक सिग्नल तोडण्यासारख्या नसतात की जेथे तुम्ही लोकांना वाहने चालविताना हेल्मेट घालणो सक्तीचे करू शकता़ बलात्कारप्रकरणी तक्रार आल्यानंतरच ठोस कारवाई केली जाऊ शकत़े हा सर्व मामला पुरुष आणि स्त्रियांवर अवलंबून असतो़ कधी चांगले होते, कधी वाईट़ यात मुलायमसिंग वा अखिलेश काय करू शकतात? असेही ते म्हणाल़े (वृत्तसंस्था)