शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

एनआरसी, सीएएची गरज नाही :   पुरुषोत्तम खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:03 IST

वर्तमानातील सत्ताधाऱ्यांकडून अप्रत्यक्षरीत्या देशाचे तुकडे करण्याचे प्रयत्न होत असल्याची भीती मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे व्यक्त केली.

- नीलेश जोशीसिंदखेडराजा : अर्थव्यस्थेची सध्या अर्थहीन अवस्था आहे. एनआरसी, सीएची आज गरज नाही. राममंदिर, कलम ३७० असे प्रश्न सुटले आहे. त्यामुळे भाजपच्या हातून ग्रामपंचायतपासून अनेक सत्ता जात आहेत. मुळात राजकीय पक्षाच्या अंतर्गत प्रबोधन करणारी फळीच संपुष्टात आली आहे. त्यामुळे ही फळी सक्षम करण्यावर भर देणे गरजेचे आहे. या समस्या पाहता वर्तमानातील सत्ताधाऱ्यांकडून अप्रत्यक्षरीत्या देशाचे तुकडे करण्याचे प्रयत्न होत असल्याची भीती मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे व्यक्त केली.सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीवर आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले, अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री तथा बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार रेखाताई खेडेकर, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी गंगाधर बनबरे, जिजाऊ सृष्टीचे समन्वयक पुरुषोत्तम कडू, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, महासचिव मधुकर मेहेकरे, संभाजी ब्रीगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, सौरभ खेडेकर, सिने अभिनेते सयाजी शिंदे, उस्मानाबादचे खासदार ओम राजे निंबाळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्यासह विविध राज्यातील मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.एक जानेवारी रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायदा प्रत्यक्षात अस्तित्वात आला; परंतु यामुळे निर्माण होणाºया समस्या पाहता हा कायदा बदलण्यासाठी प्रत्यक्षात लोकसभा व राज्यसभाच ताब्यात घेण्याची गरज आहे. त्यामुळेच राजसत्ता ही मराठा सेवा संघाच्या विचाराची असायला पाहीजे. त्यादृष्टीने आता प्रयत्न करण्याची गरज आहे. एकीकडे जाती निर्मुलनावर आपण बोलतो; पण उलटपक्षी आपणच त्याला सक्षम करत आहोत. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा ही मागणी आपली पूर्वीपासूनची आहे. आदिवासी व भटक्या विमुक्तांचा विचार करता, जेथे रेशन कार्ड नाही त्यांच्या नेशनचा पत्ता नाही. त्यांना एनआरसी का लावणार असा प्रश्न उपस्थित करुन ओबीसी असल्याचे भासवत हे सत्तेत बसले आहेत. एंकदरीत परिस्थिती पाहता व्यावहारीक स्तरावर सर्वांनी या विरोधात एकत्र आल्याशिवाय काही बाबी स्पष्ट होणार नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र येण्याची गरज अ‍ॅड. खेडेकर यांनी व्यक्त केली. सोबतच नागरिकत्व देण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी हा कायदा केला, पण जाणीवपूर्वक त्यात धर्म घातला व समस्या निर्माण केली.‘शिवाजी महाराज के मावळे’ असं म्हणायला हव होतंभाजपने प्रसिद्ध केलेल्या ‘त्या’ पुस्तकाच्या संदर्भात बोलताना अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे म्हणण्याऐवजी ‘शिवाजी महाराज के मावळे’ असे म्हटले असते तर चालले असते असे सांगत त्यांनी आपली भूमीका स्पष्ट केली.महाराष्ट्र भूषण पुरस्कार गोठवला!२०१४ नंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार जवळपास गोठवल्या सारखा आहे. अलीकडील काळात हा पुरस्कारच दिल्या गेलेला नाही. येत्या १९ फेब्रुबारी रोजी हा पुरस्कार शिवनेरी गडावरून दिला जावा. प्रसंगी याबाबत सुधारणा करून मृत पावलेलया व्यक्तींनी तो देण्याबाबत सुधारणा केली जावी. प्रसंगी तो प्रबोधनकार ठाकरे यांना दिल्यासही हरकत नसावी, असे अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकारत्मक माणूस आहेत. जिजाऊ सृष्टीच्या विकासाठी त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, असेही ते पुढे म्हणाले.शिवस्मारक जमीनीवरच व्हावे!मराठा सेवा संघाची पूर्वीपासून शिवस्मारक जमिनीवर व्हावे, अशी भूमीका आहे व ते कमीत कमी कालावधीत पूर्णत्वास जावे, असेही अ‍ॅड. खेडेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. दरम्यान, या स्मारकासाठी राजभवन परिसराची जागा योग्य असून, महालक्ष्मी रेस फोर्स व डाक यार्ड परिसरातील समुद्रालगत ते व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.संघटना तरुणावस्थेत हवी!मराठा सेवा संघाच्या अधिक मजबुतीसाठी आगामी काळात प्रयत्न होणे गरजेचे आहे. संघटना ही सातत्याने तरुणावस्थेत हवी. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन संघटनात्मक बांधणीसाठी झोकून द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली. 

टॅग्स :Jijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवjijau shrusti, sindhaked rajaजिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजाpurushottam khedekarपुरुषोत्तम खेडेकरNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी