नाशिक : इस्लामी कालगणनेच्या हिजरी सन १४३९ला आज संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात होती; मात्र चंद्रदर्शन राज्यात कोठेही घडले नाही. नाशिक विभागीय चांद समितीकडेही कु ठल्याही शहरातून चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही प्राप्त होऊ शकली नाही. हिजरी सन १४३८चा समारोप होऊन मुस्लीम बांधवांच्या हिजरी सन १४३९ नववर्षाला प्रारंभ होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.गुरूवारी उर्दू महिना ‘जिलहिज्जा’ची २९ तारीख असल्याने संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याची शक्यता वर्तविली जात होती. ढगाळ हवामानामुळे रात्री उशिरापर्यंत चंद्रदर्शन कोठेही घडल्याची माहिती नाशिक विभागीय चांद समितीला मिळाली नाही. चांद समिती व धर्मगुरूंच्या झालेल्या बैठकीत चालू महिन्याचे तीस दिवस पुर्ण करून शुक्रवारी संध्याकाळपासून हिजरी सन १४३९चा पहिला महिना मुहर्रमची एक तारीख सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले. इस्लामी कालगणनेचा पहिला महिना म्हणून ‘मुहर्रमुल हराम’ ओळखला जातो. हा महिना धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या प्रिय कन्या हजरत फातिमा यांचे पुत्र शहीद हजरत इमाम-ए-हूसेन यांच्या स्मृतींना उजाळा देतो. मुहर्रमचे पहिले दहा दिवस मुस्लीम बांधवांकडून ठिकठिकाणी इमाम-ए-हुसेन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘यादे शहिदे करबला’ या प्रवचनमालांचे आयोजन केले जाते. नाशिकमध्येही जुने नाशिक, वडाळागाव, वडाळारोड, सातपूर, देवळाली कॅम्प आदि परिसरांमध्ये दहा दिवसीय प्रवचनमालांचे विविध धार्मिक सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. मुहर्रमच्या दहा तारखेला मुस्लीम बांधवांकडून ‘आशुरा’चा दिवस पाळला जातो.
चंद्रदर्शन नाही : इस्लामी नववर्ष हिजरी सन १४३९ ला शुक्रवारी संध्याकाळी होणार प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 19:56 IST
इस्लामी कालगणनेच्या हिजरी सन १४३९ला आज संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात होती; मात्र चंद्रदर्शन राज्यात कोठेही घडले नाही. नाशिक विभागीय चांद समितीकडेही कु ठल्याही शहरातून चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही प्राप्त होऊ शकली नाही.
चंद्रदर्शन नाही : इस्लामी नववर्ष हिजरी सन १४३९ ला शुक्रवारी संध्याकाळी होणार प्रारंभ
ठळक मुद्दे शुक्रवारी संध्याकाळी हिजरी सन १४३८चा समारोप होऊन मुस्लीम बांधवांच्या हिजरी सन १४३९ नववर्षाला प्रारंभ होणारशुक्रवारी संध्याकाळपासून हिजरी सन १४३९चा पहिला महिना मुहर्रमची एक तारीख सुरू होईल नाशिक विभागीय चांद समितीकडेही कु ठल्याही शहरातून चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही प्राप्त होऊ शकली नाही