शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मोदी लाटेवरून गटांगळ्या! नवनीत राणांची लगेचच दुसऱ्या दिवशी पलटी; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 6:12 PM

विरोधकांनी राणांचा हाच मुद्दा उचलून धरला होता. यावरून वातावरण तापतेय हे लक्षात येताच राणा यांनी पलटी मारली आहे. 

अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी लाट आहे, असे समजू नका, असे सांगत प्रचाराला लागण्याचे आदेश दिले होते. यावरून विरोधकांनी राणांचा हाच मुद्दा उचलून धरला होता. यावरून वातावरण तापतेय हे लक्षात येताच राणा यांनी पलटी मारली आहे. 

माझे विधान मोडून-तोडून दाखविण्यात आल्याचा दावा राणा यांनी केला आहे. देशात मोदींची लाट आहे आणि राहणार असे त्या म्हणाल्या. देशाच्या प्रगतीसाठी मोदींची गरज आहे. विरोधकांनी हे वक्तव्य मोडून-तोडून दाखविले, असा आरोप त्यांनी केला. 

राणा यांच्या वक्तव्यामुळे मोदी लाट असल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. शरद पवार राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी राणा खरे बोलत असल्याचे म्हटले होते. 

राणा नेमके काय म्हणालेल्या...ही निवडणूक अशी लढवावी लागेल की ग्राम पंचायतची आहे. आपल्याला सर्व मतदारांना दुपारी १२ पर्यंत मतदान बुथवर आणावे लागेल व त्यांना मतदान करा असे सांगावे लागेल. जर कोणाला वाटत असेल की मोदी लाट आहे तर लक्षात ठेवा २०१९ मध्ये मी अपक्ष म्हणून निवडून आले होते, असे राणा म्हणाल्या होत्या. म्हणजेच मोदी लाट वगैरे काही नाही, मी अपक्ष निवडून आले होते, असे त्यांना म्हणायचे होते. या विधानावर त्या फसल्या आहेत. 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाamravati-pcअमरावतीBJPभाजपाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४