शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कुठल्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही : उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 21:26 IST

जी आज आढावा बैठक घेतली. त्यात कोणत्याही विकासकामाला स्थगिती किंवा रद्द करण्यात आलेला नाही.

मुंबईः जी आज आढावा बैठक घेतली. त्यात कोणत्याही विकासकामाला स्थगिती किंवा रद्द करण्यात आलेला नाही. त्याऐवजी ही कामं गतीनं कशी होतील, त्याच्याकडे आम्ही लक्ष देतोय. त्यातसुद्धा प्राधान्यक्रम ठरवून पुढची वाटचाल होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे. आज भाजपाच्या काळातील समृद्धी महामार्ग, मेट्रो प्रकल्पांच्या स्थितीचा आम्ही आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे बोलत होते. विशेष म्हणजे या बैठकीला मेट्रोच्या अश्विनी भिडे, समृद्धी महामार्गाचे राधेश्याम मोपलवार उपस्थित होते. प्रकल्पांची आवश्यकता, त्यांना लागणारा खर्च, निधीच्या उपलब्धतेसाठी कामांचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. भाजपाच्या काळातील प्रकल्प पुढे कसे जातील, मेट्रोला फायदा कसा होईल आणि हे प्रकल्प अधिक वेगानं कसे पूर्ण होतील, यासाठी प्रकल्पांना पाठिंबा देण्याचं धोरण स्वीकारलं आहे. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमध्ये आर्थिक बोजा आहे, तो बोजा परतफेडीसाठी सरकारही भूमिका बजावणार आहे. प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावेत ही आमची भूमिका आहे. याच्यावर मुख्यमंत्री महोदय भाष्य करतील, असे जयंत पाटील म्हणाले.आज झालेल्या या बैठकीमध्ये सध्या राज्यात कोणकोणते प्रकल्प सुरू आहेत, त्यांची वस्तुस्थिती काय आहे, तसेच या प्रकल्पांसाठी आतापर्यंत किती खर्च झालेला आहे, याचा आढावा घेण्यात आला आहे. या मुद्द्यांवर बैठकांमध्ये आढावा घेण्यात येणार असून, स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली होती. बैठकीला सर्व मंत्री आणि संबंधित अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकांमध्ये मेट्रो, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेनसह इतर सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMetroमेट्रोBullet Trainबुलेट ट्रेन