टीकेची पर्वा नाही, जळगाव जिल्हा पाठीशी असल्याचे समाधान - एकनाथ खडसे
By Admin | Updated: June 11, 2016 16:33 IST2016-06-11T16:33:12+5:302016-06-11T16:33:12+5:30
जळगाव जिल्हा पाठीशी असल्याचे समाधान आहे, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी शनिवारी आपल्या भावना व्यक्त केल्या

टीकेची पर्वा नाही, जळगाव जिल्हा पाठीशी असल्याचे समाधान - एकनाथ खडसे
>ऑनलाइन लोकमत -
जळगाव, दि. 11 - काल मंत्री होतो आज नाही...पंधरा दिवस खूप टीका झाली, याची मला पर्वा नाही. जळगाव जिल्हा पाठीशी असल्याचे समाधान आहे, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी शनिवारी आपल्या भावना व्यक्त केल्या. मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे हे शनिवारी सकाळी 6.15 वाजता जळगावात आले. कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेतल्यानंतर त्यांनी निवास्थानी गर्दी करून असलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.
आता आपणास कुणाशीही बोलायचे नाही. पंधरा दिवस खूप कौतूक झाले..आता पुरे. जे बोलू ते विविध आरोपांची चौकशी पूर्ण झाल्यावरच. साधे दिल्लीला कौटुंबिक कारणाने गेलो त्याचीही बातमी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारली. मोदी दिल्लीत नव्हते. पक्षाध्यक्ष अमित शहा नव्हते. हे मला इतके वर्षे पक्षात राहून समजणार नाही काय? त्यामुळे आता पुरे. काहीही बोलायचे नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.