शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘सत्तेसाठी विचाराशी तडजोड नाही, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भिवंडीत सेक्युलर फ्रंट बनवणार’, हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 15:14 IST

Bhiwandi Nizampur Municipal Corporation Mayor Election: भाजपाचे काही नगरसेवक पक्षाचा आणि विचारांचा त्याग करून धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी झाले असून, भिवंडीचा महापौर आणि उपमहापौर सेक्युलर फ्रंटचा होईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई -  भिवंडी महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवली व सर्वात जास्त ३० नगरसेवक विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या १२ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला पण बहुमतासाठी आणखी ४ नगरसेवकांची आवश्यकता होती. भाजपा आणि शिंदेसेना यांच्यासोबत जायचे नाही ही काँग्रेसची भूमिका आहे. त्या भूमिकेशी काँग्रेसने त़डजोड केली नाही. आता भाजपाचे काही नगरसेवक पक्षाचा आणि विचारांचा त्याग करून धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी झाले असून, भिवंडीचा महापौर आणि उपमहापौर सेक्युलर फ्रंटचा होईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.

टिळक भवन येथे खा. सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांच्यासह प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपाचा त्याग करुन सेक्युलर फ्रंटसोबत येण्याचा निर्णय घेतलेले नारायण चौधरी हे पूर्वी काँग्रेस पक्षातच होते. आज त्यांनी काही सहकाऱ्यांसह भाजपाचा विचार सोडून स्वतंत्र गट स्थापन केला आणि काँग्रेस प्रणित आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागील २४ दिवसांत इतर समविचारी पक्षांशी चर्चा केली, आता कोंडी फुटली असून,  भिवंडीचा महापौर, उपमहापौर, स्थायी समिती याबाबतचा निर्णय घेण्यासाठी तातडीने निरीक्षक पाठवले जाणार आहेत. हे निरीक्षक सर्वांशी चर्चा करतील व त्यानंतर निर्णय घेतला जाईल. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) १२ व भाजप सोडून आलेले नगरसेवक मिळून भिवंडीत सत्ता स्थापन केली जाईल.

भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) खासदार बाळ्यामामा म्हात्रे यावेळी म्हणाले की, भिवंडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सेक्युलर फ्रटंची स्थापन करून सत्ता स्थापन्याचा प्रयत्न मागील २४ दिवसापासून सुरु होता. समाजवादी पक्षाशी चर्चा केली पण त्यांनी शिंदेसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता भाजप सोडून काही नगरसेवक आघाडीत सहभागी झाल्याने सत्ता स्थानपनेचा मार्ग मोकळा झाला आहे. असे खासदार बाळ्यामामा म्हात्रे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन रयतेचे राजे, मराठी मनाचा मानबिंदू आणि संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांनी सकाळी दादरच्या शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसचे पक्ष कार्यालय टिळक भवन येथेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्य़ात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : No compromise on ideology for power; secular front in Bhiwandi.

Web Summary : Congress aims to form a secular front in Bhiwandi to keep BJP out of power. With support from NCP and breakaway BJP corporators, Congress is confident of securing the mayoral position. Discussions are underway to finalize the power-sharing arrangement.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Bhiwandi Nizampur Municipal Corporation Electionभिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६congressकाँग्रेसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळBJPभाजपा