शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार किंवा पोलिसांकडून डॉक्टरांवर कोणतीही सेन्सॉरशिप नाही : डॉ. अविनाश भोंडवे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 19:11 IST

शासनाकडून डॉक्टरांची गळचेपी होत असल्याची चर्चा निरर्थक

ठळक मुद्देयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ईमेलवरून साधला संपर्क

पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशनचे २१४ शाखांचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकाऱ्यांना पाठवलेले पत्र हा अंतर्गत संवादाचा भाग आहे. आपण स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन पत्रात करण्यात आले होते. मात्र, पत्र जाणीवपूर्वक  व्हायरल करण्यात आले. सरकारकडून किंवा पोलिसांकडून डॉक्टरांवर कोणतीही सेन्सॉरशिप लादण्यात आलेली नाही, असे आयएमएचे राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ईमेलवरून संपर्क साधला असून, सायबर सेलकडे तक्रार नोंदवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.डॉक्टरांनी शासनाविरोधात आक्षेपार्ह विधाने करू नयेत, एखाद्या मुद्द्यावर चर्चा जरूर व्हावी, मात्र त्यातून भडकावू भाषा असू नये, असा सूचना देणारे पत्र २० एप्रिल रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्यभरातील विविध शाखांचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी यांना पाठवण्यात आले होते. महाराष्ट्र सायबर सेलकडून याबाबतच्या सूचना मिळाल्याचे पत्रात म्हटले होते. हे पत्र सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाले आणि शासन डॉक्टरांची गळचेपी करत असल्याची चर्चा सुरू झाली. ही सर्व चर्चा निरर्थक असून सरकार किंवा पोलिसांकडून डॉक्टरांवर कोणतीही सेन्सॉरशीप लादण्यात आलेली नाही, असे भोंडवे यांनी नमूद केले.डॉ. भोंडवे यांनी 'लोकमत'ला सांगितले, 'ते पत्र आयएमएच्या अंतर्गत संवादाचा भाग होते. डॉक्टरांनी स्वयंशिस्त कशा प्रकारे पाळावी, याबाबत त्यामध्ये चर्चा झाली. मात्र, पत्र खोडसाळपणे व्हायरल करण्यात आले. कोरोनाच्या संकटात आम्ही शासनाला पूर्ण सहकार्य करत आहोत. सर्व यंत्रणा हातात हात घेऊन लढत आहेत. त्यामुळे शासनाकडून डॉक्टरांची गळचेपी होत असल्याची चर्चा निरर्थक आहे. याबाबत सायबर सेलकडे तक्रार करणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ईमेल वरून बोलणे झाले आहे.'

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार