शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ना सीबीआय चौकशी, ना एसटीवर उपाय; अधिवेशनात विरोधकांची झोळी रिकामीच

By यदू जोशी | Updated: December 26, 2021 08:13 IST

Maharashtra : शेतकऱ्यांची वीज कापण्याच्या मुद्यावरही सरकारकडून ठोस घोषणा मिळवण्यात विरोधक कमी पडले, तसेच सरकारचीही असंवेदनशीलता दिसून आली. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचे चित्र होते, ते असे.

- यदु जोशीमुंबई : सरकारी नोकरभरतीच्या पेपरफुटीची सीबीआय चौकशीची मागणी सभागृहाबाहेर त्वेषाने करणाऱ्या विरोधकांना प्रत्यक्ष विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये ती पदरी पाडून घेण्यात अपयश आले. एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘खो’ दिला. शेतकऱ्यांची वीज कापण्याच्या मुद्यावरही सरकारकडून ठोस घोषणा मिळवण्यात विरोधक कमी पडले, तसेच सरकारचीही असंवेदनशीलता दिसून आली. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचे चित्र होते, ते असे.

राज्यातील मंत्री, नेते सीबीआय, ईडीच्या रडारवर असताना भ्रष्टाचाराची काही नवीन प्रकरणे विरोधक पोतडीतून काढतील, पेपरफुटीसारख्या गंभीर विषयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काही गौप्यस्फोट करतील, अशी अपेक्षा असणाऱ्यांची जरा निराशाच झाली. आपल्या वाक्चातुर्याने त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. 

पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी सीआयडी, एखादा आयोग वा निवृत्त न्यायाधीशांमार्फत तरी व्हावी यासाठी सरकारवर दबाव टाकण्यात विरोधकांची ताकद कमी पडल्याचे दिसले. शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यानंतर, ‘माफी मागत नाही तोवर सभागृह चालू देणार नाही’ असा पवित्रा फडणवीस यांनी घेतला.

भाजपच्या १२ सदस्यांच्या निलंबनात महत्त्वाची भूमिका बजावलेले जाधव यांना फडणवीस यांनी माफी मागायला लावली. पेपरफुटीची सीबीआय वा अन्य चौकशी लावत नाही, एसटीच्या संपावर तोडगा काढत नाही तोवर सभागृह चालू देणार नाही, अशा आग्रही भूमिकेचा अभाव दिसला. गोंधळ घालायचा की कामकाज चालू द्यायचे या संभ्रमात विरोधी पक्ष दिसला. गोंधळाऐवजी चर्चेला प्राधान्य दिले, हे चांगलेच. पण त्या चर्चेतून ठोस घोषणा पदरी पाडून घेण्यात आलेले अपयश मात्र खटकणारे आहे.

कालबद्ध कार्यक्रम सरकार - एसटी संपावर तोडगा तर सोडाच उलट, न्यायालय देईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असे आधी सरकारने म्हटलेले असताना, ‘विलीनीकरण आता विसरा’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठामपणे सांगणे, शेतीची वीज कापण्यास स्थगिती न देणे यातूनही सरकारच्या असंवदेनशीलतेची प्रचिती आली. - ओबीसींचा इम्पिरिकल डाटा गोळा करून त्यांना आरक्षण पुन्हा बहाल करण्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम सरकार सांगेल, ही अपेक्षाही फोल ठरली.

म्यांव, म्यांव अन् डुक्करनीतेश राणे यांचे म्यांव, म्यांव, मंत्री नवाब मलिकांचे मांजरीचे तोंड अन् कोंबडीचे धडवाले ट्विट, त्यावर राणेंनी ट्विट केलेला डुक्कर यावरून राजकारणाचा एकूणच स्तर किती खाली गेला आहे, याचा प्रत्यय आला. पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात आलेच नाहीत, दुसऱ्या आठवड्यातही त्यांचे येणे अनिश्चित आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवड करण्यास राज्यपाल मान्यता देतील का, काँग्रेस उमेदवार ठरवून याच अधिवेशनात अध्यक्षांची निवड होईल का? याचे उत्तर पुढील आठवड्यात मिळेल. तसेही, अध्यक्षांची निवड करण्याची घाई केवळ काँग्रेसला आहे, शिवसेना अन् राष्ट्रवादीला नाही.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMaharashtraमहाराष्ट्र