शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

"राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला नाही, तर मी तुम्हाला शब्द देतो की...", इम्तियाज जलील यांनी शड्डू ठोकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 11:16 IST

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांसोबत नमाज अदा केली.

औरंगाबाद-

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांसोबत नमाज अदा केली. नमाज अदा केल्यानंतर जलील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाष्य केलं. देशात बंधू-भाव आणि शांतता नांदावी अशीच दुआ मी मागितली. राज ठाकरे यांना मी आमच्या इस्लाम धर्मानुसार बंधू-भावाच्या उद्देशानं इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं होतं. पण ते त्यांनी स्वीकारलं नाही. त्यानंतर औरंगाबादच्या सभेत त्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली त्यानंतर ते आता बोलावण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत, असं इम्तियाज जलील म्हणाले. 

राज ठाकरेंना इफ्तारीसाठी बोलावलं होतं. आता त्यांना ईदचा शिरखुरमा खाण्यासाठी बोलावणार का? असं जलील यांना विचारण्यात आलं असता त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. "राज ठाकरेंनी औरंगाबादच्या सभेत ज्या पद्धतीची भाषा वापरली ती पाहता आता ते शिरखुरमाचं निमंत्रण देण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत. त्यांना मी दुरूनच ईद मुबारक देतो", असं इम्तियाज जलील म्हणाले. 

...तर दुप्पट मोठी सभा घेऊन दाखवेनराज ठाकरेंविरोधात कारवाईबाबत बोलताना इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवरही ताशेरे ओढले. "राज ठाकरेंवर अजूनही एफआयआर दाखल का होत नाही हा प्रश्न मला पडला आहे. ते मुख्यमंत्र्यांचे भाऊ आहेत म्हणून त्यांना कायदा वेगळा आहे का? मी तुम्हाला शब्द देतो की राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला नाही. तर त्यांनी जिथं सभा घेतली तिथंच त्यांच्यापेक्षा दुप्पट मोठी सभा मी घेईन, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे. इम्तियाज जलील यांच्या या इशाऱ्यानंतर राज्य सरकार आता काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

राज ठाकरेंवर कारवाई होणार?मशिदीवरील भोंगे हटवावे यामागणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाष्य केले. त्यानंतरच्या उत्तरसभेत आणि औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी ४ मे रोजी ज्याठिकाणचे लाऊडस्पीकर हटणार नाहीत तेथील मशिदीसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावू असा अल्टीमेटम सरकारला दिला आहे. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यावर राज्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे असा आरोप सत्ताधारी पक्षांनी केला आहे. यातच राज ठाकरेंनी चिथावणीखोर विधान केले असून त्यांना अटक करावी अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. तसेच राज यांच्यावर कारवाईसाठी विविध संघटनांची मागणी आहे. औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यावरून आक्रमक इशारा दिला. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. 

इम्तियाज जलील झाले भावूकऔरंगाबादच्या ईदगाह मैदानावर रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नमाज अदा करताना खासदार इम्तियाज जलील भावूक झालेले पाहायला मिळाले. नमाद अदा करताना जलील यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. याबाबत त्यांना विचारण्यात आलं असता आपल्या आईच्या आठवणीनं आपण भावूक झाल्याचं त्यांनी सांगितलं. "ईद ही माझी आई आहे आणि माझ्या आईचं दोन महिन्यांपूर्वी निधन झालं. तिच्या आठवणीनं मी भावूक झालो. आई ही शेवटी आई असते. तिचं स्थान सर्वांपेक्षा मोठं असतं", असं इम्तियाज जलील म्हणाले. 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे