शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

१ ऑक्टोबरपर्यंत ‘त्या’ १२ आमदारांची नियुक्ती नाही, याचिकेवरील सुनावणी १ ऑक्टोबरपर्यंत तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 06:00 IST

याचिकाकर्ते ठाकरे गटाचे  कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांच्या वकिलांनी पुढील सुनावणी होईपर्यंत १२ आमदारांची नियुक्ती न करण्याचा आदेश सरकारला देण्याची विनंती केली.

मुंबई : राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांची नियुक्ती आणखी काही काळ रखडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी १ ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. 

याचिकाकर्ते ठाकरे गटाचे  कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांच्या वकिलांनी पुढील सुनावणी होईपर्यंत १२ आमदारांची नियुक्ती न करण्याचा आदेश सरकारला देण्याची विनंती केली. सरकारने जे गेल्या दोन वर्षांत केले नाही, ते आता लगेच करणार नाही, असा टोला मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने हाणला.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने या याचिकेत आता काही उरले नसल्याचेही म्हटले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना यादी देण्यात आली होती.

कोश्यारी यांनी या नियुक्त्या केल्या नाहीत. याबाबत मोदी  यांनी जनहित  याचिका दाखल केली आहे. मविआ सरकारने १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपालांना शिफारस केली होती. मात्र, तत्कालीन राज्यपालांनी ती यादी मंजूर केली नव्हती.

टॅग्स :Courtन्यायालयMLAआमदार