शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

महापालिकेला टाळे ठोकायला हवे - नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 05:45 IST

कमला मिल जळीतकांडानंतर महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्याचे फक्त नाटक केले. आता पालिकेने सर्व हॉटेलचालकांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. ही मुदत केवळ सेटलमेंटच्या हेतूने देण्यात आलेली आहे.

मुंबई - कमला मिल जळीतकांडानंतर महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्याचे फक्त नाटक केले. आता पालिकेने सर्व हॉटेलचालकांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. ही मुदत केवळ सेटलमेंटच्या हेतूने देण्यात आलेली आहे. या मुदतीनंतर कोणावरच कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे स्वाभिमान संघटना १५ जानेवारी रोजी पालिकेवर मुंबईकरांचा मोर्चा काढणार असल्याची घोषणा काँग्रेस आमदार व स्वाभिमानचे अध्यक्ष नितेश राणे यांनी केली. पालिकेतील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना मुंबईकरांशी कसलेच देणेघेणे नाही त्यामुळे पालिकेला टाळे ठोकायला हवे, असेही ते म्हणाले.कमला मिल जळीतकांडानंतर महापालिका प्रशासन मुंबईकरांच्या डोळ्यांत धूळफेक करत आहे. ३२५ रेस्टॉरंटवर कारवाई सुरू असल्याचा दावा करण्यात आला. अचानक इतकी मोठी कारवाई केली याचा अर्थ या सर्व ठिकाणी अनधिकृत अनियमितता असल्याची कल्पना होती. दोन दिवस धडक तोडक कारवाई करण्याच्या फार्सनंतर आता १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. केवळ सेटलमेंटसाठी ही मुदत आहे. या कालावधीत ज्यांना जिथे पैसे पोहोचवायचे आहेत तिथे पोहोचवता यावेत यासाठीच हा मुदतीचा फार्स असल्याचे नितेश राणे म्हणाले.स्वत: पालिका आयुक्तांनी पालिका अधिकाºयांच्या भ्रष्टाचाराची कबुली दिली आहे. त्यामुळे सर्व अधिकाºयांवर नियमानुसार कारवाई करीत त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे. ते सोडून आता माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचाडाव आखण्यात येत आहे. जेणेकरून भविष्यात कोणी पालिकेच्या विरोधात काही बोलू-लिहू नये, यासाठी माहिती अधिकार कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा डाव आखण्यात आला आहे. पालिकेने आखलेले हे षड्यंत्र आहे, असा आरोप राणे यांनीकेला आहे.पालिका आयुक्तांनी कारवाई करू नये यासाठी बड्या धेंडांचा दबाव असल्याचे स्वत: आयुक्तच सांगत आहेत. असे असेल तर आयुक्तांनी गप्प बसता कामा नये. प्रत्यक्षात पालिका आयुक्तांनी स्वत:हून पुढाकार घेत या प्रकरणातील सर्व बड्या धेंडांची नावे जाहीर करावीत, अशी मागणीदेखील राणे यांनी केली.बाळा खोपडेचा दबदबाबाळा खोपडे नावाची व्यक्ती हॉटेलात परवानगी, ओसी मिळवायची असेल, तर थेट काम करून देते. त्याच्याकडे रेटकार्ड तयार आहे. त्याला आमदार, खासदार किंवा नगरसेवकाची गरजच नाही.या व्यक्तीवर कारवाई करण्याची हिंमत आयुक्तांनी दाखवावी. त्यांनी ही हिंमत दाखवल्यास गेट वे आॅफ इंडियावर जाहीर सत्कार करेन, असे राणे म्हणाले.रूफटॉपला विरोध नाहीरूफटॉपच्या संकल्पनेला आमचा विरोध नाही. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी करायला हवी.जगभरात अनेक मोठ्या शहरांत नाइटलाइफ व रूफटॉप आहे. त्यामुळे या धोरणातील त्रुटी दूर करून योग्य अंमलबजावणी करावी.सीबीआय चौकशी कराकमला मिलची सर्व चौकशी पारदर्शक होण्यासाठी आयुक्तांकरवी नव्हे, तर सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करावी.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे MumbaiमुंबईKamala Mills fireकमला मिल अग्नितांडव