नितीनभाई ईद मुबारक :
By Admin | Updated: July 30, 2014 01:25 IST2014-07-30T01:25:13+5:302014-07-30T01:25:13+5:30
राजकारणात जय-पराजय चालत असतो पण मतभेद पक्षीय राजकारणापुरतेच असतात. ईद साजरी करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी खा. विलास मुत्तेमवार समोरासमोर आले. आनंदाच्या या क्षणी दोघांनीही

नितीनभाई ईद मुबारक :
राजकारणात जय-पराजय चालत असतो पण मतभेद पक्षीय राजकारणापुरतेच असतात. ईद साजरी करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी खा. विलास मुत्तेमवार समोरासमोर आले. आनंदाच्या या क्षणी दोघांनीही एकमेकांना मोकळेपणाने मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या. लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे असलेले दोन नेते मोकळेपणाने परस्परांना भेटले. येथे कुठलेच राजकारण नव्हते. ईदचा आनंद साजरा करताना दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या तेव्हा साऱ्यांनाच आनंद झाला. निवडणुकीनंतर प्रथमच ही नेतेमंडळी मोमिनपुऱ्यात एकत्रित आली. हा बंधूभावाचा, आनंदाचा क्षण मोमिनपुऱ्यात अनेकांनी अनुभवला.