नितीन आगेचा खून जातीयवादातुनच : गद्रे

By Admin | Updated: May 17, 2014 21:54 IST2014-05-17T18:36:08+5:302014-05-17T21:54:19+5:30

नितीन आगेचा खून हा तत्कालीन रागातून नसून, जातीयवादातूनच झालेला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे व युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजेंद्र गद्रे यांनी केले.

Nitin kills his blood: Gadre | नितीन आगेचा खून जातीयवादातुनच : गद्रे

नितीन आगेचा खून जातीयवादातुनच : गद्रे

शिरसगाव काटा : नितीन आगेचा खून हा तत्कालीन रागातून नसून, जातीयवादातूनच झालेला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे व युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजेंद्र गद्रे यांनी केले.
नगर जिल्‘ातील खर्डा या गावी नितीन आगे या दलित तरुणाच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघ व युवक काँग्रेसच्या पतीने शिरूरचे तहसीलदार रघुनाथ पोटे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता शिंदे, राळेगणसिद्धीचे माजी सरपंच विलास पोटे, नीलेश ढवळे, खंडू गंगणे, रमेश जगताप, प्रशांत फुलपगर, दक्षता नियंत्रण समितीचे पोपट शेलार आदी उपस्थित होते.
केंद्राने ॲट्रॉसिटी कायद्यात ठोस बदल करणारा वटहुकूम मार्चमध्ये काढला आहे. त्याची त्वरेने माहिती ग्रामपंचायत पातळीपासून प्रसारित करण्यात यावी व यावर त्वरित अंमलबजावणी न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चर्मकार महासंघ व युवक काँग्रेसने संयुक्तरीत्या देण्यात आला.

Web Title: Nitin kills his blood: Gadre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.