शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

"केस नसताना डोक्यावरून कंगवा फिरवणारे खूप"; गडकरींचा मुख्यमंत्रि‍पदावरून मविआच्या नेत्यांना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 13:34 IST

Nitin Gadkari on Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रि‍पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून दावेदारी केली गेली. इच्छुकांबद्दल बोलताना नितीन गडकरींनी टोलेबाजी केली. 

Nitin Gadkari News in marathi: महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रि‍पदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी चिमटा काढला. केस नसताना डोक्यावर कंगवा फिरवणारे खूप लोक असतात, असे गडकरी म्हणाले. महाविकास आघाडीला बहुमतच मिळणार नाही, असे राजकीय भाकितही नितीन गडकरींनी केले. 

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला नितीन गडकरींनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडीतील अंतर्गत कलहावर सूचक भाष्य केले. 

काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रि‍पदावरून जोरदार दावेदारी सुरू आहे, तुम्ही याकडे कसं बघता? असा प्रश्न नितीन गडकरींना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना नितीन गडकरींनी महाविकास आघाडीला टोला लगावला. 

"सिनेमा आला होता, थांब टकल्या भांग पाडते"

नितीन गडकरी म्हणाले, "नाही, त्यांच्या दावेदारीत काही अर्थ नाही. असं प्रत्येक जण दावेदारी करत असतो. एक सिनेमा आला होता, 'थांब टकल्या भांग पाडते'. केस नसताना डोक्यावर कंगवा फिरवणारे खूप लोक आहेत. नाना (नाना पटोले) त्यातले आहेत, असं मला म्हणायचं नाही."

"महाविकास आघाडी ही सर्कस आणि शरद पवार रिंगमास्टर"

गडकरी पुढे म्हणाले, "आता सध्या आघाडीमध्ये खूप मुख्यमंत्री आहेत. काही सुप्त आहेत, काही अतृप्त आहेत. काही दिसतात, काही दिसत नाहीत. पण, ही खरी सर्कस आहे आणि या सर्कसीमध्ये रिंगमास्टर आहेत शरद पवार. ते आहेत म्हणून ही सर्कस टिकून आहे", असे गडकरी म्हणाले. 

"शरद पवार ज्या दिवशी थांबतील, एक मिनिटातं डौलारा खाली पडेल. त्यामुळे त्यांनी सांभाळून ठेवलं आहे. त्यामुळे सध्यातरी जोपर्यंत निवडणूक होत नाही... पहिलं तर बहुमतच मिळणार नाही. मिळाली तर हे बनतील अशी शक्यता नाही. तोपर्यंत प्रत्येकाने मनात आनंद घेतला की, मी होणार आहे. तर तेवढे दिवस त्यांना आनंद घेऊ द्या", असा चिमटा नितीन गडकरींनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रि‍पदासाठी असलेल्या इच्छुकांना काढला.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nitin Gadkariनितीन गडकरीSharad Pawarशरद पवारMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी