नितीन आंबुर्ले यांचे नामनिर्देशनपत्र वैध

By Admin | Updated: November 4, 2016 02:49 IST2016-11-04T02:49:13+5:302016-11-04T02:49:13+5:30

मुरुड-जंजिरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०१६ याकरिता प्रभाग क्र मांक ८ मधून निवडणूक होत आहे.

Nitin Ambarle's nomination is valid | नितीन आंबुर्ले यांचे नामनिर्देशनपत्र वैध

नितीन आंबुर्ले यांचे नामनिर्देशनपत्र वैध


आगरदांडा/ मुरुड : मुरुड-जंजिरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०१६ याकरिता प्रभाग क्र मांक ८ मधून निवडणूक होत आहे. याकरिता नगराध्यक्षासह ७३ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. यांची छाननी बुधवारी नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात झाली, रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. अपक्ष उमेदवार नितीन आंबुर्ले यांचे नामनिर्देशनपत्र दिवसभराच्या आक्षेपानंतर रात्री वैध ठरविण्यात आले.
प्रभाग क्र मांक ६ (ब) सर्वसाधारणमधील प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी सुरू असताना नामनिर्देशनपत्र अ.क्र . ६८वरील अपक्ष उमेदवार नितीन आंबुर्ले यांचे नामनिर्देशनपत्र छाननीसाठी घेतले असता त्याच भागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ रणदिवे यांनी लेखी आक्षेप नोंदवला. नितीन आंबुर्ले यांच्या नामनिर्देशनपत्रातील पाच सूचकांपैकी सूचक क्र .१ रवींद्र कारेकर यांची स्वाक्षरी ही बनावट आहे. त्यामुळे त्यांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात यावे अशी लेखी मागणी केली त्यानंतर नितीन आंबुर्ले यांनी माझ्या नामनिर्देशनपत्रावर सूचक म्हणून रवींद्र यांची स्वाक्षरी आहे असे सांगितले.
बुधवारी सायंकाळी ५ वाजता रवींद्र कारेकर ,नितीन आंबुर्ले, विश्वनाथ रणदिवे सभागृहात हजर राहिले. निवडणूक निर्णय अधिकारी वानखेडे यांनी रवींद्र कारेकर यांना नितीन नामदेव आंबुर्ले यांच्या नामनिर्देशनपत्रावर सूचक म्हणून तुमची स्वाक्षरी आहे का याबाबत रवींद्र कारेकर यांना विचारणा के ली. त्यांनी आंबुर्ले यांच्या नामनिर्देशनपत्रावर केलेली स्वाक्षरी माझीच आहे असे सत्यप्रतिज्ञेवर सांगितले आहे. त्यानुसार रवींद्र कारेकर यांचे म्हणणे ग्राह्य धरु न नितीन आंबुर्ले यांचे प्रभाग क्र मांक ६(ब) सर्वसाधारण या जागेकरिताचे नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात आले आहे .
मुरुड -जंजिरा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी ७३ जणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. छाननीत ९ नामनिर्देशनपत्र नगरसेवकांसाठी आलेले उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले, तर नगराध्यक्षपदासाठी २ नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आले.
छाननी प्रक्रिया संपन्न झाली असली तरी खऱ्या अर्थाने आजपासून ते ११ नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र कोणते उमेदवार मागे घेतात त्यावरु न आखाड्यातील खरे प्रतिस्पर्धी समजणार आहेत. गुरुवारी एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.(वार्ताहर)

Web Title: Nitin Ambarle's nomination is valid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.