शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नितेश राणेंच्या 'त्या' वक्तव्याकडे फार लक्ष देऊ नये; प्रकाश आंबेडकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 18:50 IST

Prakash Ambedkar On Nitesh Rane : आमदार निलेश राणे हे अकोला दौऱ्यावर असताना त्यांनी पोलिसांविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते.

Prakash Ambedkar On Nitesh Rane : (Marathi News) मुंबई : भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे हिंदू जनआक्रोष मोर्चाच्या निमित्ताने राज्यभर आंदोलन करुन सभा घेत आहेत. दरम्यान, निलेश राणे हे अकोला दौऱ्यावर असताना त्यांनी पोलिसांविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर विरोधकांनी नितेश राणे यांच्यासह सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. याबाबत वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना विचारले असता नितेश राणे वेडा आमदार असून, त्यांना फार महत्त्व देऊ नये. त्यांच्या वक्तव्यामुळे फार काही फरक पडणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी नितेश राणे यांच्याविषयी म्हणाले की, नितेश राणे यांच्या यांच्यावर कारवाई होऊ शकते, मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करू नये. त्यांच्यावर कारवाई न करता त्यांच्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष करावे व सोडून द्यावे. एक वेडा आमदार, खासदार बोलतोय असे म्हणावे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे. त्यांच्या बोलण्याचा किंवा त्यांच्या बेताल वक्तव्याचा कोणताही परिणाम लोकांवर आणि समाजावर होत नाही. त्याकडे फार लक्ष देऊ नये, असे प्रकाश आंबेडकर स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, आमदार निलेश राणे हे अकोला दौऱ्यावर असताना त्यांनी पोलिसांविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. पोलीस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही? ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील. पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, असे वादग्रस्त विधान आमदार नितेश राणे यांनी केले होते. त्याआधी सोलापूरमधील सभेत आमचा बॉस सागर बंगल्यावर बसतो, त्यामुळे पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, असेही आमदार नितेश राणे यांनी विधान केले होते. 

याआधीही वेडा आमदार म्हणून उल्लेख!हिवाळी अधिवेशनात भाजपा आमदार नितेश राणे यांनी फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या सलीम कुत्तावरून अनेक आरोप केले होते. त्यानंतर आमदार नितेश राणे यांच्या आरोपावर बोलताना काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी नितेश राणे हे वेडे झाले असून, ते उल्लेख करत असलेला सलीम कुत्ता मृत्यू झाल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले होते. कैलास गोरंट्याल यांनी म्हटले होते की, मी जो सलीम कुत्ता सांगतोय त्याचा 1998 साली मृत्यू झाला आहे. आता नितेश राणे सांगत आहेत, तो चुकीचा सलीम कुत्ता आहे. नितेश राणे वेडे आहेत. माझी चौकशी करायची करा, मी 24 तास इकडे  आहे. पण, माझी बदनामी करणार असेल तर मी कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला होता.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNitesh Raneनीतेश राणे