शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

Nitesh Rane : नीतेश राणे यांच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 06:01 IST

Nitesh Rane : निलंबनाच्या मागणीवर मंगळवारी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात बैठक होणार असून, सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रकरणातील कोणालाही सोडणार नाही, असा इशारा गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिला.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नीतेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे तर विधिमंडळ अधिवेशनातही या हल्ल्याचे पडसाद उमटले. हल्ल्यातील आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी शिवसेना सदस्यांनी लावून धरली.

निलंबनाच्या मागणीवर मंगळवारी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात बैठक होणार असून, सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रकरणातील कोणालाही सोडणार नाही, असा इशारा गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिला. पोलीस अधीक्षक स्वत: या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या हल्ल्यातील एका आरोपीला दिल्लीतून विधान भवनाच्या पायऱ्यांवरून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे जात असताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ‘म्याऊ-म्याऊ’ असा आवाज काढल्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले आणि सभागृहाचे कामकाज तालिका अध्यक्षांना तहकूब करावे लागले. 

सुड भावनेतून कारवाई : नारायण राणेआगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला पराभव दिसत आहे. त्यामुळे राजकीय सुडाच्या भावनेने आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी नागपूरला सांगितले. ॲग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीच्या समारोप समारंभात ते प्रमुख पाहुणे होते. दरम्यान, संध्याकाळी दौरा अर्धवट सोडून ते तातडीने मुंबईकडे रवाना झाले.नीतेश राणे यांनी काहीही केलेले नाही. त्यांचा काहीही संबंध नाही. सत्ताधारी पक्षाला येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ही कारवाई केली जात आहे. आमदार राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहेत. त्यांना अज्ञातवासात जाण्याची गरज नाही. सरकारला जे करायचे आहे, ते त्यांनी करावे. अशा प्रकारची कारवाई होत असल्याचे समजल्याने काेर्टात जावेच लागले, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे