कणकवलीत नितेश राणेंच्या नेतृत्त्वात चक्काजाम
By Admin | Updated: January 31, 2017 13:55 IST2017-01-31T13:12:25+5:302017-01-31T13:55:24+5:30
कणकवलीत काँग्रेसचे आमदार नितेश राणेदेखील चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी नितेश राणेंसह कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले.

कणकवलीत नितेश राणेंच्या नेतृत्त्वात चक्काजाम
ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. 31 - मराठा आरक्षणासहीत विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चानं आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. कणकवलीत काँग्रेसचे आमदार नितेश राणेदेखील चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी नितेश राणेंसह कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले.
राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास ठोक आंदोलनाचा इशारा यावेळी नितेश राणेंनी दिला. मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवलीतील गांगो मंदिरापासून पटवर्धन चौकापर्यंत चालत आरक्षणासहित विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे.