शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

Niranjan Davkhare: "...तर आयएएस किंवा आयपीएस झालो असतो" 

By अजित मांडके | Updated: June 22, 2025 14:02 IST

राजकारणाच्या पलीकडे बोलायचे झाले, तर वाचनाची आवड आहे, व्हिडीओ बघताना ज्ञानात भर घालणारेच पाहतो. वेबसिरीज बघणे हा माझा आवडता छंद आहे.

- निरंजन डावखरे, आमदार, भाजपमला लहानपणापासून राजकारणाची आवड होती, किंबहुना राजकारणाचे बाळकडू हे मला माझ्या वडिलांकडून वसंत डावखरे यांच्याकडून मिळाले. परंतु, जर राजकारणी झालो नसतो, तर आयएएस किंवा आयपीएस नक्की झालो असतो, किंबहुना ते व्हायला मला आवडले असते. परंतु, आता राजकारणात मी स्थिरस्थावर झालो आहे.

राजकारणाच्या पलीकडे बोलायचे झाले, तर वाचनाची आवड आहे, व्हिडीओ बघताना ज्ञानात भर घालणारेच पाहतो. वेबसिरीज बघणे हा माझा आवडता छंद आहे. ज्यातून आपल्याला राजकारणात फायदा होईल किंवा आपल्या एकूणच देहबोलीसाठी फायदा होईल तेच पाहण्याचा, वाचण्याचा प्रयत्न करतो.कुटुंबाला वेळ देतो

राजकारणाबरोबर कुटुंबाकडे लक्ष द्यावेच लागते. त्यामुळे वेळ मिळेल तसा कुटुंबासोबत चित्रपट पहावयास जाणे, वर्षातून एकदा चार ते पाच दिवस फिरायला जाणे हे नियमित करतो. कुटुंबासोबत असतो, तेव्हा सर्व वेळ हा केवळ आणि केवळ कुटुंबासाठीच असतो.

माझ्या मुलाचा पदवीदान समारंभ होता, परंतु राजकारणात कामाच्या धबडग्यात मला जाता आले नाही. राजकारणात आल्यानंतर मला सतत कुटुंबाला वेळ देता येणे शक्य होणार नाही, याची पत्नी, मुले यांना कल्पना असल्याने ते मला नेहमीच सहकार्य करतात. त्यांचा ही ऋणी आहे.

चरित्र, आत्मचरित्र वाचतो

मला जास्तीत शैक्षणिक उपक्रमाची पुस्तके वाचायला आवडतात, जीवनचरित्र, आत्मचरित्र मला अधिक भावते. कपड्यांबाबत सांगायचे, तर मला शर्ट पॅन्ट किंवा झब्बा कुर्ता हेच कपडे घालण्यास आवडतात. 

प्रेम विवाहाला विरोध झाला नाही

माझी पत्नी मुस्लिम असली, तरी लग्नाला घरातून कधीही विरोध झाला नाही. पत्नीच्या घरातील काही मंडळींकडून काही शंका उपस्थित झाल्या होत्या. परंतु, दोन्ही कुटुंबांनी हे लग्न स्वीकारले. आमचा सुखाचा संसार सुरू आहे.

विकी आवडता कलाकार

हिंदीमध्ये अमिताभ बच्चन, दिलीप कुमार आणि आताच्या काळातील विकी कौशल हे माझे आवडते कलाकार आहेत.

वडापाव प्रिय आहे...

माझा आवडता खाद्यपदार्थ वडापाव आहे, तसेच मिसळ खाण्यास आवडते. ती गरमागरम मिळाली, तर खूपच उत्तम. खाण्याचे कोणत्याही प्रकारचे पथ्य पाळत नाही.

फडणवीसांकडून आधार

मी २०१८ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच काळात माझे वडील वसंत डावखरे यांचे निधन झाले होते. त्यामुळे राजकीय आणि घरातील परिस्थिती विस्कळीत झाली होती. त्याच वेळेस मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधार दिला. त्यामुळेच मी राजकारणात खऱ्या अर्थाने रुजलो. 

कोकणात फिरतो

कुटुंबाबरोबर कोकणात फिरायला आवडते. पर्यटनाच्या दृष्टीने कोकणात खूप सौंदर्य आहे. तेथील खाद्य संस्कृती पर्यटकांना आकर्षित करते.

तीन दिवस व्यायाम

कुटुंबामध्ये सर्वजण फिटनेसच्या दृष्टीने विशेष लक्ष देतो. पूर्वी आठवड्याच्या सातही दिवस फिटनेसकडे लक्ष दिले जात होते. परंतु, आता कामाचा ताण वाढला असल्याने आठवड्यातील तीन दिवस तरी फिटनेसकडे लक्ष देतो. 

वडिलांकडून शिकलो

संबंध  महत्त्वाचे असतात हे वडिलांकडून शिकलो  पद, प्रतिष्ठा हे सर्व क्षणिक आहे. आज आहे, उद्या नाही. परंतु, जोडलेले संबंध कायमस्वरूपी तुमच्याबरोबर राहतात. किंबहुना तुम्ही गेल्यानंतरही ते तुमच्या कुटुंबाबरोबर राहतात. 

शब्दांकन : अजित मांडके

टॅग्स :Niranjan Davkhareनिरंजन डावखरेBJPभाजपाPoliticsराजकारणthaneठाणे