अन्नातून नऊ जणांना विषबाधा

By Admin | Updated: July 7, 2016 02:40 IST2016-07-07T02:40:05+5:302016-07-07T02:40:05+5:30

बुलडाण्याच्या मोताळा तालुक्यातील घटना

Nine people poisoning food | अन्नातून नऊ जणांना विषबाधा

अन्नातून नऊ जणांना विषबाधा

मोताळा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील वाघजाळ येथे अन्नातून ९ जणांना विषबाधा झाली. यात दीड वर्षीय चिमुकला गंभीर आहे. ही घटना मंगळवारी रात्री ८च्या सुमारास घडली.
वाघजाळ येथील कडुबा गाडेकर यांचेकडे त्यांची बहीण अंजना भागवत पाटील व तिचे पती आले होते. मंगळवारी सायंकाळी जेवण झाल्यानंतर उलट्या सुरू झाल्याने सर्वांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दीड वर्षीय सर्मथ अनंता गाडेकर हा बालक गंभीर आहे.

Web Title: Nine people poisoning food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.